सोशल मीडियाची क्रेझ लोकांमध्ये तुफान आहे. या सोशल मीडियाला कलाकार देखील तितकेच भुलले आहेत. शिवाय या सोशल मीडियावर असलेल्या वेगवेगळ्या गोष्टी देखील नेहमी ट्रेंडिंगमध्ये असतात. सध्या इंस्टावरील रिल्स हे खूपच गाजत आहे. या रिल्सची भुरळ कलाकरांना देखील पडलेली आपल्याला नेहमीच पाहायला मिळते. अनेक कलाकार त्यांचे वेगवेगळे रिल्स सतत त्यांच्या अकाऊंटवरून पोस्ट करत असतात. कलाकारांमध्ये रिल्सची सर्वात जास्त क्रेझ आणि सर्वात जास्त रिल्स कोण करते, तर ते नाव आहे क्युट कपल म्हणून ओळखले जाणारे रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा यांचे. हे दोघं नेहमी त्यांचे फनी रिल्स पोस्ट करताना आणि प्रकाशझोतात येतात.

सोशल मीडियावर या दोघांचे एक नवीन रिल्स गाजताना दिसत आहे. या दोघांच्या रिल्समध्ये आता तिसऱ्याची एन्ट्री झाली आहे. या रिल्समध्ये रितेशसोबत जेनेलिया आणि दिग्दर्शिका, कोरिओग्राफर फराह खान देखील दिसत आहे. ते तिघं घरवाली बाहरवाली गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या रिल्समध्ये रितेश कधी जेनेलियाकडे तर कधी फराहकडे जाताना दिसत असून, मागे घरवाली बाहरवाली गाणे वाजत आहे. शेवटी फराह आणि जेनेलिया निघून जातात, फराह पुन्हा येते आणि फराह रितेशला बळजबरी ओढून घेऊन जाते. (riteish deshmukh dance with genelia d souza farah khan)
हा व्हिडिओ फराह खानने शेअर केला असून, तिने कॅप्शनमध्ये लिहिले, “माझा डार्लिंग रितेश जेव्हा त्याची घरवाली जेनेलिया देशमुखला आमच्या शोमध्ये घेऊन आला. माझे दोन आवडते.” हा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत असून, फॅन्स आणि कलाकारांकडून त्याला भरभरून प्रतिसाद देखील मिळत आहे.
फराह खान लवकरच झी टीव्हीवर तिचा एक नवा कॉमेडी शो ‘झी कॉमेडी नाईटस’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्यात अनेक टीव्ही कलाकार झळकणार आहेत. या शोच्या प्रमोशनसाठी फराहने झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमात संकेत भोसले, सुगंधा मिश्रा, तेजस्वी प्रकाश, अली असगर, फराह खान, पुनीत पाठक यांच्यासोबत हजेरी लावली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-अभिनेता ते साधूपर्यंत किस करण्यामुळे वादात राहिलीय शिल्पा शेट्टी; कोर्टाने जारी केला होता वॉरंट
-गौरीला ‘शक्ती : द पॉवर’मध्ये नव्हती आवडली शाहरुखची ओव्हर ऍक्टिंग; म्हणाली ‘सगळ्यात’ वाईट चित्रपट










