Monday, April 28, 2025
Home बॉलीवूड रितेश-जिनेलियाच्या लग्नाला 11 वर्ष पूर्ण, आठवणींना उजाळा देत शेअर केला लग्नाचा व्हिडिओ

रितेश-जिनेलियाच्या लग्नाला 11 वर्ष पूर्ण, आठवणींना उजाळा देत शेअर केला लग्नाचा व्हिडिओ

बॉलिवूड आणि अवध्या महाराष्ट्राचं फेवरेट कपल म्हणजेच रितेश देशमुख आणि जिनेलिया देशमुख यांच्याकडे आदर्श जोडपं म्हणून पाहिलं जातं. यांची जोडी आणि यांच्यामधील केमिस्ट्री चाहत्यांना भुरळ घालते. (दि, 3 फेब्रुवारी 2012) रोजी त्यांनी लग्न केलं असून त्यांच्या लग्नाला तब्बल 11 वर्ष झाली आहेत. मात्र, आजही या जोडप्याचं एकमेकांवरचं प्रेम पाहून असं दिसून येते की, हे नवीनच विवाह बंधनात अडकले आहेत. लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हे दोघेही ट्रेकला गेले होते. त्याशिवाय जिनेलियाने जुन्या आठवणींना उजाळा देत लग्नामधील काही खास क्षणाचा व्हिडिओ शेअर केला आहे जो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

रितेश देशमुख (Rietsh Dshmukh)  आणि जिनेलिया देशमुख (Genelia Dshmukh) ही जोडी जशी चित्रपटांमध्ये पाहायला मिळते अगदी खऱ्या आयुष्यातही हे सुपरहिट आहे. ऑनस्क्रीन या जोडीने चाहत्याचं अतोनात प्रेम मिळवलं आहे. या दोघांचं एकमेकांवरचं प्रेम पाहून अनेकांना हेवा वाटतो. अशातच आता यांच्या लग्नाला 11 वर्ष पूर्ण झाली आहेत ज्यामुळे अभिनेत्रीने जुन्या आठवणींना उजाळा देत लग्नामधला एक व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये असे दिसून येत आहे की, या जोडप्याचे लग्न ख्रिश्चन आणि मराठमोळ्या पद्धतीने करण्यात आले आहे. या फोटोंमध्ये दोघेही खूपच सुंदर दिसत आहे. तर एका फोटोमध्ये जिनेलिया सासरी जाताना भावूक झालेली पाहायला मिळत आहे. रितेश आणि जिनेलियाच्या लग्नाचं फोटोशूट रोनिका कंधारी हिने केलं होतं.

 

View this post on Instagram

 

सोशल मीडियावर रितेश आणि जिनेलियाच्या या व्हिडिओने चाहत्यांवर भुरळ घातली आहे. जिनेलियाने हा सुंदर व्हिडीओ पाहून फोटोग्राफर रोनिकाचे आभार मानले आहेत. त्याशिवाय चाहत्यांनीही व्हिडिओवर कमेंटचा वार्षाव केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘…तोपर्यत घरीच जाणार नाही’! आई आणि पत्नीच्या भांडणामध्ये नवाजुद्दीनने उललं मोठं पाऊल
सिद्धार्थच्या वडिलांच्या प्रकृतीबाबत माेठी अपडेट; आता अशी आहे तब्येत, जाणून घ्या…

हे देखील वाचा