Tuesday, June 10, 2025
Home बॉलीवूड अभिमानस्पद! वेड चित्रपटाची 50 कोटींची कमाई पाहून सिद्धार्थ जाधव थक्क, पोस्ट शेअर करत म्हणाला…

अभिमानस्पद! वेड चित्रपटाची 50 कोटींची कमाई पाहून सिद्धार्थ जाधव थक्क, पोस्ट शेअर करत म्हणाला…

दिग्दर्शक आणि अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनेलिया देशमुख यांच्या वेड चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावून ठेवलं आहे. मराठीच नाहीत तर बॉलिवूड कलाकारही या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. मराठी इंडस्ट्रीमधील सर्वाधिक कमाइ करणाऱ्या चित्रपाटांपैकी सैराट नंतर वेड चित्रपटाचं नाव घेतले जाते. बुधवार (दि, 18 जानेवारी) रोजी वेडने तब्बल 50 कोटींचा गल्ला जमवला आहे. चित्रपटाला मिळणाऱ्या प्रेमाबद्दल आणि प्रतिसादाबद्दल अभिनेत्याने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. अशातच अभिनेता सिद्धार्थ जाधव याने देखिल रितेशचे कौतुक करत पोस्ट शेअर केली आहे.

वेड (Ved) चित्रपटाचं कौतुक कारल तेवढं कमी आहे. चित्रपटाने बॉक्सऑफिसवर अनेक चित्रपटाचे रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. त्याशिवाय वेड लावणाऱ्या या चित्रपाटाची विक्रमी कमाइ पाहून सिद्धार्थ जाधवही थक्क झाला आहे. प्रदर्शणाच्या पहिल्याच दिवसापासून चित्रपटाने नवे विक्रम रचायला सुरुवात केली होती अशातच चित्रपटाने शुक्रवारी 50 कोटींचा गल्ला जवला आहे. प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादासाठी रितेश आणि जिनेलियाने पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले होते

रितेश आणि जिनेलियाच्या त्याच स्टोरीला सिद्धार्थने आपल्या इंस्टाग्रमा अकउंटवरुन रिपोस्ट करत त्यांना चित्रपटाच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यावर रितेश देशमुखने सुद्धा सिद्धार्थच्या शुभेच्छांचा आदर करत पोस्ट रिपोस्ट करत त्याला “लव्ह यू सिद्धू” असं म्हटलं आहे. रितेशने वेड चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रामध्ये पदार्पण केलं असू त्याला मोठं यश लाभलं आहे.

ritesh deshmukh story
Photo Courtesy Instagramriteishd

रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) दिग्दर्शित वेड (Ved) चित्रपटाला आणि चित्रपटामधील गाण्यांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. तब्बल 10 वर्षानंतर जिनेलिया देशमुख (Genelia Deshmukh) हिने अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं आहे. वेड चित्रपटामध्ये जिनेलिया सोबतच अभिनेत्री जिया शंकर (Jia Shankar) हिने देखिल मुख्य भूमिका निभावली आहे. तिची भूमिका देखिल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मी अधिक मजबूत झाली’, म्हणत सरोगसीवरून ट्रोल करणाऱ्यांना प्रियांकाने दिले सणसणीत उत्तर
अमिताभ बच्चनजींनी घेतली ख्रिस्तियानो रोनाल्डो आणि मेस्सीची भेट, पोस्ट शेअर करत दिल्या शुभेच्छा

हे देखील वाचा