Thursday, July 18, 2024

सैराटनंतर पुन्हा एकदा नागराज मंजुळे आणि आकाश ठोसर एकत्र, पाहिलात का टीझर?

मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी ‘सैराट’ सारखा चित्रपट बनवून वर्ल्ड रेकॉर्ड बनवला होता. यानंतर त्यांनी ‘झुंड’हा हिंदी चित्रपट बनवला होता. मात्र, या चित्रपटावर अनेकांनी टीका केली होती. पण तरीहीया चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती. यामध्ये मुख्य कलाकार बॉलिवूचे बिग बी अमिताभ बच्चन हे होते. आता पुन्हा एकदा आपले लाडके दिग्दर्शक ‘घर बंदूक बिरयानी’ हा नवीन चित्रपट घेऊन येत आहेत.

मराठी सिनेसृष्टीमधील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Mnajule) हे पुन्हा एकदा नावीन चित्रपट घेऊन चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. त्यांनी गेल्या वर्षी झी स्टुडीओसोबत नवीन चित्रपटाची घोषणा केली होती आणि एक छोटासा टीझर प्रदर्शित केला होता. चित्रपटाच्या टीझरमुळे प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दलची उत्सुकता चांगलीच वाढली होती. आगळ्या वेगळ्या रुपामध्ये टीझरचे प्रदर्शन केल्यानंतर अनेक लोकांनी पसंती दर्शवली होती.

‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाचा नुकताच टीझर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये स्वत: नागराज मंजुळे देखिल मिलेट्रीच्या भूमिकेमध्ये दिसत आहेत. या चित्रपटाच्या कथेमध्ये सुरुवातीलाच एक घनदाट जंगल दाखवल आहे आणि त्यामध्ये जोरदार धमाके होताना दिसत आहेत. यामध्ये अभिनेता सयाजी शिंदे (Sayaji Shinde) हे खलनायकाच्या भुमिकेमध्ये पाहायला मिळणार आहेत. प्रदर्शित झालेला टीझर 1 मिनिट आणि 10 सेकंदाचा आहे. हा भन्नाट आणि थ्रिलर टीझर पाहून चाहत्यांनी चांगलीच पसंती दाखवली आहे.

नागराज मंजुळे यांच्या आटपाट प्रोडक्शन आणि झा-स्टडीओजची निर्मित असलेल्या चित्रपटामध्ये आकाश ठोसर (Akash Thosar) मुख्य भूमिकेत झळकणार आहे. आकाशने या चित्रपटाचा टीझर स्वत:च्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनी देखिल महत्वाची भूमिका बजावली आहे. या चित्रपटाची कथा आणि पटकथा हेमंत अवताडे यांनी लिहिली आहे. नागराज मजुळे यांचा चित्रपट लवकरच प्रेक्षकाच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर पाहून आता प्रत्येकाला या चित्रपटाची आत्सुकता लागली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आलिया भट्टने नीतू कपूरसोबत थाटामाटात साजरी केली पहिली दिवाळी; चाहते म्हणाले,’परफेक्ट फॅमिली …’
राहुलच्या त्रासामुळे डिप्रेशनच्या आहारी गेली होती वैशाली ठक्कर, फोटो व्हायरल होण्याचे मोठे कारण

 

हे देखील वाचा