Thursday, November 7, 2024
Home मराठी रितेश भाऊंनी अभिजीतला दिली लय भारी ट्रॉफी; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

रितेश भाऊंनी अभिजीतला दिली लय भारी ट्रॉफी; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

बिग बॉस मराठी 5 ची सांगता झालेली आहे. या वर्षी सुरज चव्हाण यांनी बिग बॉस मराठीच्या ट्रॉफीवर त्याचे नाव कोरलेले आहे. तर इंडियन आयडलचा पहिला विजेता अभिजीत सावंत हा या रनर अप झालेला आहे. अभिजीत हा घरातील अत्यंत शांत व्यक्ती होता. त्याने कधीच कोणाशी वाद घातलेला नाही. त्यामुळे तोपर्यंत टॉप 2 पर्यंत पोहोचला. परंतु त्या मानाच्या ट्रॉफीवर त्याला त्याचे नाव कोरताआले नाही. परंतु त्याने संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकलेले आहे. आणि अशातच रितेश देशमुखने त्याला एक ट्रॉफी दिलेली आहे. याचा व्हिडिओ अभिजीतने नुकताच सोशल मीडियावर शेअर केलेला आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना अभिजीत म्हणाले की, “भले ट्रॉफी माझ्या हातात आली नसेल, तरी ते जाऊनही ट्रॉफी मला एक आठवण म्हणून दिली आहे. हे देताना ते मला म्हणाले की, एक असा व्यक्ती ज्याने खूप प्रामाणिकपणे आपल्या प्रवास पूर्ण केला सुसंस्कृत पद्धतीने हा बिग बॉसचा खेळ खेळला. अगदी खरा व्यक्ती राहिला. ज्याने लोकांचेच नाहीतर माझे मन जिंकलं. म्हणून मला त्यांनी हे लय भारी गिफ्ट दिले. ही साधी ट्रॉफी असेल साधी गोष्ट असेल, तरी जे शब्द त्यांनी माझ्यासाठी संबोधले. त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. एक माणूस म्हणून मी माझे अस्तित्व या घरात चांगल्या पद्धतीने टिकवू शकलो. याचा मला अभिमान आहे. लोक किती काही बोलू देत मला माहितीये की खरी गोष्ट काय आहे धन्यवाद.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Abhiijeet Saawant (@abhijeetsawant73)

 

यासोबतच त्याने कॅप्शनमध्ये ‘खूप खूप धन्यवाद रितेश भाऊ. तुम्हाला माझा गेम आवडला मी तुमचे मन जिंकले याचा मला खूप आनंद होत आहे. आणि ही लई भारी ट्रॉफी तुम्ही मला दिली यासाठी मनापासून आभार”असे कॅप्शन दिलेले आहे. सध्या त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला चर्चेत आलेला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

शारदेची आराधना असणारं ‘फुलवंती’ चित्रपटातील ह्रदयस्पर्शी गाणे
टाटांसारख्या व्यावसायिकांसाठी व्यवसाय म्हणजे केवळ नफा नसून त्याहून अधिक असतो; रतन टाटांविषयी पहा काय म्हणाला होता शाहरुख खान…

हे देखील वाचा