Friday, July 5, 2024

जेनेलिया आणि रितेशच्या सुखी संसाराचे गुपित आले लोकांसमोर, रितेश म्हणतोय तुम्हीही हा कानमंत्र लक्षात ठेवा

रितेश, जेनेलिया बॉलिवूड मधील सुंदर आणि लोकप्रिय कपल आहे. या जोडीने २०१२ मध्ये धुमधडाक्यात लग्न केले. त्यानंतर जेनेलियाने चित्रपटांमध्ये काम करणे कमी केले. पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत जेनेलिया दिसली असली तरी पूर्णवेळ काम करणे तिने बंद केले होते.

२००३ मध्ये आलेल्या ‘तुझे मेरी कसम’ सिनेमातून दोघांनीही अभिनयाची सुरुवात केली. आज ह्या जोडीला दोन मुलं आहेत. मात्र आता पुन्हा एकदा ह्या जोडीला सोबत अभिनय करायचा आहे. ही दोघे अनेक जाहिराती, व्हिडिओ मधून एकत्र झळकत असले, तरी त्यांना आता सोबत सिनेमा करायचा आहे.

ही गोड जोडी नुकतीच ऑनलाइन सेलिंग प्लेटफॉर्म मधल्या व्हिडिओच्या लेडीज वर्सेज जेंटलमेन या एका प्रोजेक्टमध्ये सोबत दिसली. या दोघांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले की, ‘जर चांगली कथा आली तर आम्ही नक्कीच सोबत काम करू.’ यावेळी जेनेलिया म्हणाली, ‘हो नक्कीच आम्हाला सोबत काम करायचे आहे. माझी तर अशी इच्छा आहे की, मी आता पुन्हा नव्याने जेव्हा एखादया सिनेमात दिसेल तेव्हा माझ्या सोबत रितेशचा असावा. कारण आम्ही दोघांनी एकाच सिनेमातून पदार्पण केले. मी ब्रेक घेतला तेव्हा माझा शेवटचं सिनेमा देखील रितेश सोबत होता. त्यामुळे मला वाटते की आता माझा जो सिनेमा येईल त्यात पुन्हा मी आणि रितेशने सोबत काम करावे.”

त्यांच्या सुखी वैवाहिक आयुष्याचा कानमंत्र सांगताना रितेश म्हणाला, ‘ मी आणि जेनेलियाने असे ठरवले आहे की दिवसभरात जेनेलिया मला फक्त दहाच प्रश्न विचारेल आणि मीही त्या दहा प्रश्नांना उत्तर देईन. पण जेनेलिया दिवस सुरु झाला की पहिल्या पाचच मिनिटात मला एकसाथ दहा प्रश्न विचारते.’ यावर जेनेलियाने सांगितले, ” मी रितेशला असेच प्रश्न विचारते जे प्रश्न माझ्यासाठी आवश्यक आहे. त्या प्रश्नांचे उत्तर देणे न देणे रितेशच्या हातात असते. ते म्हणतात ना हैप्पी वाईफ हैप्पी लाईफ”.

रितेशने त्याच्या मुलांबद्दल सांगताना म्हटले की, ” माझ्या मुलांना माहीतच नव्हते की मी चित्रपटात काम करतो. त्यांना असे वाटते की इतर मुलांच्या वडिलांसारखे आपले वडीलही काम करतात आणि कधीतरी सिनेमात अभिनय करतात.”

यावेळी जेनेलियाने तिच्या कोरोनाच्या अनुभवाबद्दल देखील सांगितले. ती म्हणते. ” कोरोनाचा काळ माझ्यापेक्षा जास्त रितेश आणि माझ्या मुलांसाठी खूप कठीण होता. सर्व सुरळीत चालू होते आणि अचानक माझा कोरोना रिपोर्ट पॉसिटीव्ह आला. पण मला या काळात माझ्या आई-वडिलांनी, मित्रांनी खूप मदत केली.

हे देखील वाचा