Monday, July 8, 2024

रितेशची मुलं बोलतात अस्खलित ‘मराठी’, हे पहा त्यांचे मराठी बोलतानाचे खास व्हिडिओ

हिंदी सिनेसृष्टीतील मराठमोळा अभिनेता म्हणून रितेश देशमुख ओळखला जातो. हिंदीसोबतच मराठीमध्ये देखील रितेशने त्याच्या अभिनयाचे नाणे खणखणीत वाजवले आहे. रितेशने २०१२ साली अभिनेत्री जेनेलिया डिसुझा सोबत लग्न केले. रितेश आणि जेनेलिया या क्युट कपलला दोन रिहान आणि राहील अशी दोन मुलं आहेत.

तसे पाहिले तर कलाकारांच्या मुलांचे सामान्य लोकांना खूप आकर्षण असते. कधी कधी कलाकारांच्या मुलांनाही कलाकारांपेक्षा जास्त लाइमलाइट मिळत असते. अगदी तैमुरपासून आराध्या बच्चन पर्यंत अनेक स्टार कीड त्यांच्या आई, वडिलांपेक्षाही लोकप्रिय आहेत.

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसुझा या दोघांचे मुलं देखील लोकप्रिय आहे. रितेश आणि जेनेलिया नेहमीच त्यांच्या मुलांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. अनेक वेळा फोटोग्राफर आणि पत्रकारांना पाहिल्यावर रिहान आणि राहील पोज देताना दिसतात.

रितेश आणि जेनेलियाने त्यांच्या दोन्ही मुलांना खूप चांगले संस्कार दिले आहेत. रितेश हा महाराष्ट्रीयन असून जेनेलिया ख्रिश्चन आहे. असे असूनही जेनेलिया सुंदर आणि स्वच्छ मराठी बोलते. रितेशच्या घरात सर्व जणं मराठीच बोलत असल्याने जेनेलिया सोबतच त्यांची मुलं देखील सुंदर मराठी बोलतात. आजच्या या काळात जिथे असंख्य घरांमध्ये इंग्रजी भाषेचा मुलांवर होणारा मारा बघता, रितेश-जेनेलिया यांनी त्यांच्या मुलांना मातृभाषेत बोलण्याची सवय लावली आहे.

रितेशने त्याच्या मुलांचे अनेक व्हिडिओ शेयर केले आहे, ज्यात रिहान आणि राहील मराठीत बोलताना दिसत असतात. रितेशने २०२० मध्ये गणपतीच्या दिवसांमध्ये त्यांच्या दोन्ही मुलांचा गणपती बनवतानाच एक व्हिडिओ पोस्ट केला होता, ज्यात रिहान आणि राहील अस्खलित मराठी बोलताना दिसत होते. शिवाय त्यांचा दसऱ्याला पूजा करताना गायत्री मंत्र म्हणत असल्याचा व्हिडिओ त्याने पोस्ट केला होता.

बॉलिवूडमधील सर्वात सुंदर आणि गोड जोडी म्हणून रितेश, जेनेलियाकडे पाहिले जाते. जेनेलियाने लग्नानंतर चित्रपटांमध्ये काम करणे खूप कमी केले असून, ती तिचा वेळ मुलांना आणि घराला देत असते.

हे देखील वाचा