Tuesday, July 9, 2024

रितेश देशमुखने सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूवर केले दुःख व्यक्त; म्हणाला, ‘खूप लवकर गेलास…’

सिनेसृष्टीवर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ‘बालिका वधू’ फेम आणि ‘बिग बॉस १३’ चा विजेता सिद्धार्थ शुक्ला याचा गुरुवारी (२ सप्टेंबर) मृत्यू झाला. सिद्धार्थ केवळ ४० वर्षांचा होता. हृदयविकाराचा झटका आल्यांनतर त्याला लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला. टेलिव्हिजन कलाकारांसोबत बॉलिवूडमधील अनेक कलाकार देखील दुःख व्यक्त करत आहेत.

यातच अभिनेता रितेश देशमुख याने ट्वीट करून त्याला श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्याने लिहिले आहे की, “हा धक्का शब्दांच्या पलीकडील आहे. खूप लवकर गेलास, त्याच्या कुटुंबियांच्या आणि जवळच्या व्यक्तींप्रती संवेदना. त्याला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते.” त्याने केलेल्या या ट्वीटवर कमेंट करत अनेकजण सिद्धार्थबद्दल दुःख व्यक्त करत आहेत. यासोबत अनेक कलाकार तसेच त्याचे चाहते सोशल मीडियावर त्याचे फोटो शेअर करून त्याला श्रद्धांजली अर्पण करत आहेत. (riteish deshmukh tweeted on the death of sidharth shukla said gone to soon )

सिद्धार्थ हा एक लोकप्रिय कलाकार होता. त्याने अनेक मालिकांमध्ये तसेच चित्रपटात काम केले आहे. ‘बिग बॉस १३’ मध्ये तो खूप चर्चेत असणारा स्पर्धक होता. बिग बॉसमध्ये असताना त्याची शहनाझ गिलसोबत ओळख झाली. तिथेच त्यांच्या मैत्रीला सुरुवात झाली. बिग बॉसमध्ये एकत्र वेळ घालवल्यावर त्यांची मैत्री आणखी घट्ट झाली होती. त्यानंतर त्याची जोडी खूप लोकप्रिय झाली. ते दोघे अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये दिसले होते. तसेच त्याच्या अफेअरच्या चर्चा देखील रंगल्या होत्या, पण त्यांनी कधीच त्यांच्या नात्याचा खुलासा केला नाही.

सिद्धार्थने त्याच्या करिअरची सुरुवात मॉडेलिंगपासून केली होती. त्यानंतर त्याला अनेक ऑफर आल्या आणि तो टेलिव्हिजन आणि बॉलिवूडमध्ये काम करू लागला. त्याने त्याच्या करिअरमध्ये ‘बालिका वधू’, ‘दिल से दिल तक’, ‘लव्ह यू जिंदगी’, ‘खतरों के खिलाडी’, ‘सीआयडी’, ‘बिग बॉस’ यामध्ये काम केले आहे. यासोबतच त्याने ‘हम्टी शर्मा की दुल्हनिया’ या चित्रपटात काम केले आहे. बिग बॉसचा विजेता झाल्यानंतर त्याच्या चाहत्यावर्गात खूप भर पडली होती. आता त्याच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर त्याच्या चाहत्यांना खूप दुःख झाले आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बिग ब्रेकिंग! सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

-बहीण आणि मेहुण्याने बेशुद्ध अवस्थेत सिद्धार्थला नेले होते रुग्णालयात; वाचा कोण आहे त्याच्या कुटुंबात

‘बिग बाॅस’ फेम सिद्धार्थ शुक्लाची काय होती शेवटची सोशल मीडिया पोस्ट?

हे देखील वाचा