रितेश देशमुख बॉलिवूडसोबतच मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील सक्रिय आहे. चित्रपटांमध्ये अभिनय करत असणाऱ्या रितेशने आता ‘वेड’ या मराठी सिनेमाच्या निमित्ताने दिग्दर्शनात पाऊल टाकले आहे. या कामात तो कितीही व्यस्त असला तरीही सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय असतो. रितेश आणि जिनिलिया यांचे सोशल मीडियावरील व्हिडिओ तर तुफान व्हायरल होत असतात. त्यांचे हे व्हिडिओ मजेशीर असल्यामुळे नेटकऱ्यांचे त्यावर विशेष प्रेम आहे. रितेश आणि जिनिलिया यांचा कोणताही नवीन व्हिडिओ आला की, लगेच तो व्हायरल झाला पाहिज़े आणि चर्चेत आलाच पाहिजे असे आहे. स्वतःच्या बळावर मनोरंजनविश्वात नाव कमावलेल्या रितेशने त्याच्या नव्या व्हिडिओमधून तरुणांना एक संदेश दिला आहे.
फेब्रुवारी महिना लागला की, सर्वच तरुण मंडळी १४ फेब्रुवारी या दिवसाची आतुरतेने वाट बघत असतात. फेब्रुवारी महिन्यात येणार व्हॅलेंटाईन डे म्हणजे तरुणांसाठीच नाही सर्व प्रेम करणाऱ्या मंडळींसाठी कोणत्याही सणापेक्षा कमी नसतो. रितेशच्या फॅन पेजवरून त्याचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, हा व्हिडिओ त्याने खास व्हॅलेंटाईन डे साठीच तयार केला आहे. या व्हिडिओमध्ये रितेश एका पुतळ्याजवळ उभा असून त्या निर्जीव पुतळ्यासोबत तो बोलताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये रितेश त्या पुतळ्याला म्हणतो की, “१४ फेब्रुवारीपर्यंत बघून घ्या सेटिंग नाही झाली तर समजून घ्या की तू फक्त जनगणनासाठीच जन्माला आला आहेस.”
रितेश हा व्हिडिओ सध्या तुफान गाजत असून, नेटकरी यावर भन्नाट प्रतिक्रिया देत आहे. या व्हिडिओमधून त्याने सिंगल असलेल्या लोकांना चांगलाच चिमटा काढला असून, या व्हिडिओमधील रितेशच्या लूकचे देखील व्हिडिओसोबत लोकं कौतुक करत आहे. या व्हिडिओमध्ये त्याने पिवळ्या रंगाचाच कुर्ता आणि जीन्स घातली आहे. रितेशच्या व्हिडिओमधील त्याचा अभिनय आणि मजेशीर कंटेंट नेहमीच प्रेक्षकांच्या आकर्षणच बिंदू असतो.
सध्या रितेश त्याच्या पहिल्या दिग्दर्शकीय ‘वेड’ या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असून, या सिनेमातू जिनिलिया मराठी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करत आहे, याशिवाय नुकताच त्याने त्याचा आगामी हिंदी सिनेमा ‘मिस्टर मम्मी’ची देखील घोषणा केली आहे. या सिनेमात तो आणि जिनिलिया मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या सिनेमाच्या पोस्टरमध्ये रितेश आणि जिनिलिया दोघेही प्रेग्नेंट दिसत आहे, त्यामुळे सिनेमाबद्दल आतापासूनच लोकांमध्ये खूप उत्सुकता निर्माण झाली आहे.
हेही वाचा-