Wednesday, July 3, 2024

जीममध्ये वर्कआऊट करणे रितेश दादाला पडले महागात, आता झालीय ‘अशी’ अवस्था

रितेश देशमुख हा मराठी तसेच हिंदी सिने जगतातील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने आणि देखण्या लूकमुळे त्याने चित्रपट जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळेच रितेश देशमुखचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या सोशल मीडियावरुन तो अनेक मजेशीर रिल्स त्याच्या चाहत्यांसाठी शेअर करत असतो. सध्या रितेशचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये रितेश देशमुखला जीममध्ये वर्कआऊट करणे चांगलेच महागात पडलेले दिसत आहे, काय आहे हे नेमके प्रकरण चला जाणून घेऊ. 

बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुख अनेकदा त्याचे मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करतो, जे त्याच्या चाहत्यांना खूप आवडतात. आता अलीकडे अभिनेत्याने जिमचा एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रितेश जिममध्ये वर्कआउट करताना दिसत आहे. लेग वर्कआऊटनंतर तो लंगडत उभा करताना आणि त्याच्या फनी स्टाइलमध्ये चालताना दिसला.व्हिडिओ पोस्ट करताना रितेशने ‘पायाच्या व्यायामाचे दुष्परिणाम’ असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे. त्याच्या या व्हायरल व्हिडिओवर चाहते जोरदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Ritesh Deshmukh (@riteishd)

त्याच्या या व्हिडिओमध्ये एका चाहत्याने ‘सर तुम्ही सर्वोत्तम आहात, खूप मजेदार असे म्हणत रितेशचे कौतुक केलेले दिसत आहे. दरम्यान याआधीही रितेश देशमुखचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. रितेश नेहमीच त्याच्या चित्रपटांमधील विनोदी भूमिकांसाठी ओळखला जातो. मस्ती, हाऊसफुल आणि धमाल यांसारख्या चित्रपटातून रितेशने प्रेक्षकांना खूप हसवले आहे. लॉकडाऊनमध्ये रितेश देशमुख आणि जेनेलियाच्या टिकटॉक व्हिडिओने नेटकऱ्यांना वेड लावले होते.

हे देखील वाचा