Wednesday, July 3, 2024

टिकटॉक बंद झाल्याने रितेश झाला होता बेरोजगार; मुलाखतीत अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा

हिंदी चित्रपटसृष्टीतील मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख आपल्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. रितेशने कसदार अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. विनोदी भूमिका असो किंवा खलनायकाची भूमिका असो, रितेशने प्रत्येक भूमिकेत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. रितेश देशमुख सोशल मीडियावर सुद्धा सतत सक्रिय असतो.

कोरोना काळात रितेश आणि जिनिलियाच्या टिकटॉक व्हिडिओंनी चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले होते. मात्र, सरकारने टिकटॉकवर बंदी घातली. ज्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. अभिनेता रितेश देशमुखने सुद्धा टिकटॉक बंद झाल्यानंतर मी पूर्ण बेरोजगार झालो होतो, असा धक्कादायक खुलासा केला आहे.

अभिनेता रितेश आणि जिनिलिया हे हिंदी चित्रपटसृष्टीतील क्यूट जोडपे म्हणून ओळखले जातात. दोघेही सोशल मीडियावर सतत चर्चेत असतात. कोरोना काळात रितेश आणि जिनिलियाच्या टिकटॉक व्हिडिओंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. दोघांच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केल होत. परंतु मधेच टिकटॉकवर भारत सरकारने बंदी घातल्यामुळे सगळ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. याबद्दल खुद्द रितेश देशमुखने एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

एका मुलाखतीमध्ये बोलताना रितेश देशमुखने टिकटॉक बंद झाल्याने बेरोजगार झाल्यासारखं वाटत होते, असे सांगितले आहे. याबद्दल बोलताना रितेश देशमुख म्हणाला की, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जेव्हा देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केले गेले. त्या काळात त्यांनी टिकटॉक वापरण्यास सुरुवात केली. कोरोना काळात टिकटॉक व्हिडिओच्या माध्यमातून आपण चाहत्यांना हसवू शकतो या उद्देशाने त्यांनी टिकटॉकवर व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली.

त्यांच्या टिकटॉक व्हिडिओला चाहत्यांनी सुद्धा भरभरून प्रतिसाद दिला होता. मात्र, चीनसोबतच्या वादामुळे भारत सरकारने सर्व चीनी ऍप बंद करण्याचा निर्णय घेतला, ज्यामध्ये टिकटॉकचाही समावेश होता.

याबद्दल बोलताना रितेश देशमुख म्हणाला की, टिकटॉक बॅन झाल्यानंतर तो खूपच चिंतेत पडला होता. आपण जणू बेरोजगार झालोय असेच त्याला त्यावेळी वाटतं होते. तो विचार करू लागला की, ‘देवा आता मी काय करू, एकच काम होत ते सुद्धा गेले,’ असे म्हणत टिकटॉक बंद झाल्यानंतर नाराजी व्यक्त केल्याचे रितेश देशमुखने सांगितले. त्याचवेळी त्यांना रील्स बनवण्याची कल्पना सुचली. त्यानंतर रितेश आणि जिनिलिया दोघेही रील्स बनवू लागले. इंस्टाग्रामवर त्यांच्या रील्स चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहेत.

अलीकडेच रितेश आणि जिनिलिया टीव्हीवरील अनेक कार्यक्रमांत एकत्र दिसून आले होते. अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात दोघे सहभागी झाले होते. ज्यामध्ये दोघांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत खूप मस्ती केली होती.

दरम्यान, जिनिलियाने लग्नानंतर चित्रपटसृष्टीतून निवृत्ती घेतली आहे. रितेश आजही चित्रपटात काम करत आहे. अक्षय कुमार आणि बॉबी देओलसोबत ‘हाऊसफुल 4’ मध्ये त्याने काम केले होते. या चित्रपटातील रितेशच्या भूमिकेचे जोरदार कौतुक झाले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुरू तुरू चालू नको’, म्हणत शालूने शेअर केला तिचा अफलातून व्हिडिओ, तिच्या लूकने वेधले सर्वांचे लक्ष

-डीप नेक ड्रेसमधील मराठमोळी अभिनेत्री मिथिला पालकरचे फोटो व्हायरल, सर्वत्र रंगलीय तिच्या लूकची चर्चा

-श्रुती मराठेच्या साडीमधील फोटोचे चाहत्याकडून कौतुक, म्हणाला, ‘…तेव्हा आणखीनच भारी दिसते’

हे देखील वाचा