Monday, June 23, 2025
Home बॉलीवूड रितेश देशमुखने मित्रासोबत केला रोमॅंटिक डान्स पत्नी जेनेलियाची प्रतिक्रिया पाहून व्हाल थक्क

रितेश देशमुखने मित्रासोबत केला रोमॅंटिक डान्स पत्नी जेनेलियाची प्रतिक्रिया पाहून व्हाल थक्क

मराठमोळा सुपरस्टार रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आपल्या अभिनयासाठी तर लोकप्रिय आहे. त्याचप्रमाणे तो सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असतो. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन तो नेहमीच मजेशीर रिल्स टाकत असतो ज्यावर त्याचे प्रेक्षकही जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत असतो. सध्या रितेश देशमुखचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.ज्यामध्ये रितेश भैय्याचा कॉमेडी अंदाज पाहायला मिळत आहे. पण रितेश भैय्याच्या या व्हिडिओमुळे जेनेलिया मात्र चांगलीच संतापलेली दिसत आहे. काय आहे हा व्हिडिओ चला जाणून घेऊ. 

रितेश देशमूख हा मराठी आणि हिंदी चित्रपट जगतातील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने त्याने चित्रपट जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. चित्रपटांप्रमाणेच रितेश देशमुख सोशल मीडियावरही चांगलाच सक्रिय असतो. ज्यावरुन तो अनेक मजेशीर रिल्स पोस्ट करत असतो. लॉकडाऊनच्या काळात रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलियाचे असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते. ज्याला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला होता. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रितेश देशमुख त्याच्या मित्रासोबत रोमांस करताना दिसत आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये रितेश देशमुख आपल्या एका मित्रासोबत बोटीवर रोमॅंटिक डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमधील रितेशच्या रोमॅंटिक डान्स आणि एक्सप्रेशन पाहून चाहते मात्र थक्क झाले आहेत. आशिक है ये चोर नही या गाण्यावर रितेश आणि त्याच्या मित्राने केलेला डान्स चांगलाच व्हायरल होत आहे. इतकेच नव्हेतर व्हिडिओमध्ये रितेश देशमुखची पत्नीही शेवटी दिसत आहे. जेनेलियाने त्यांच्या या डान्सवर टाळ्या वाजवत आनंद व्यक्त केलेला दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे ज्यावर चाहत्यांच्या एकापेक्षा एक भन्नाट प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा