Thursday, November 30, 2023

‘मला चित्रपटात काम करायचे नव्हते’ ‘पृथ्वीराज’ चित्रपटाची नायिका मानुषी छिल्लरने केला धक्कादायक खुलासा

सध्या बॉक्स ऑफिसवर अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar)  ‘पृथ्वीराज’ चित्रपटाची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. या चित्रपटातून अभिनेत्री मानुषी छिल्लर( Manushi Chhillar) पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. चित्रपटात मानुषी आणि अक्षय कुमार यांच्या महत्वाच्या भूमिका पाहायला मिळत आहेत. या चित्रपटामुळे मानुषी छिल्लर चांगलीच चर्चेत आली आहे. सध्या तिचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. मात्र याआधीच मानुषीने तिच्या चित्रपटातील प्रवेशाबाबत  एक धक्कादायक खुलासा केला आहे.

मानुषी छिल्लरचा जन्म हरियाणा मध्ये झाला होता. तिचे बालपण आणि शालेय शिक्षण दिल्लीमध्येच झाले. मानुषी एमबीबीएसचे शिक्षण घेत होती. याचकाळात २०१७ मध्ये तिची मिसवल्ड म्हणून अवघ्या २० व्या वर्षी निवड झाली. मिसवल्ड म्हणून निवड झाल्यानंतर मानुषीला अनेक चित्रपटांच्या ऑफर यायला लागल्या होत्या. पण या सगळ्या ऑफर मानुषीने धूडकावून लावल्या. कारण अभिनय करणे आपल्याला जमणार नाही, हे तिने पक्के ठरवले होते. पण त्यानंतर तिला अभिनेता अक्षय कुमारसोबत पृथ्वीराज चित्रपटात काम करण्याची ऑफर मिळाली. ज्याला तिने होकार दिला. अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लरचा हा चित्रपट महान सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारित आहे.

चित्रपटात अक्षय कुमारने पृथ्वीराज चौहान यांची तर मानुषीने संयोगिताची भूमिका साकारली आहे. दोघांचीही प्रेमकथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. पण अलिकडेच एका मुलाखतीत बोलताना मानुषीने सांगितले की, “ती अभिनेत्री म्हणून नाव कमवायला कधीही मुंबईत आली नव्हती. शाळेत असताना तिने अनेक नाटकांमध्ये काम केले होते. मात्र अभिनय आणि डान्स यांमध्ये मला काहीही रस नव्हता. चित्रपटात काम करायचे असते तर मी पृथ्वीराज आधी अनेक चित्रपटांमध्ये झळकले असते” असेही तिने बोलून दाखवले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

 

हे देखील वाचा