Tuesday, July 9, 2024

रितेश पांडेची पत्नी बनू इच्छिते आई! गायकाला कंटाळून म्हणाली, ‘जर…’

भोजपुरी गायक रितेश पांडे (Ritesh Panday) आणि गायिका शिल्पी राज (Shilpi Raj) यांचे प्रत्येक गाणे सध्या सुपरहिट होत आहे. दोघांच्या आवाजामुळे त्यांचे प्रत्येक गाणे चाहत्यांना मोहित करत असून जोरदार यशस्वी होत आहे. आता रितेश पांडेचे आणखी एक नवीन गाणे प्रसिद्ध झाले असून सध्या त्याची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.

प्रसिद्ध भोजपुरी गायक रितेश पांडे आपल्या बहारदार आवाजामुळे आता सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. त्याचे नवीन गाणे सध्या जोरदार हिट झाले आहे. मात्र आता सगळीकडे रितेशची बायको त्याच्या मुलांची आई होण्यासाठी उत्सुक असल्याची चर्चा सुरू झाली आहे. नाही नाही हे खरं नाही, हे सगळे त्याच्या नवीन गाण्याचे बोल आहेत. ज्याची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. नुकतेच रितेश पांडेचे ‘लईका ना कोई’ हे व्हिडिओ गाणे यूट्यूबवर प्रदर्शित करण्यात आले आहे. ज्यामध्ये रितेश पांडे गाण्यातील अभिनेत्री आरोही सिंगसोबत (Arohi Singh) जोरदार डान्स करताना दिसत आहे. त्याच बरोबर दोघांचा रोमँटिक सीनसुद्धा दाखविण्यात आला आहे. या गाण्याची कथा खूपच रंजक असून, दोघांच्या डान्समुळे ते चाहत्यांना खूपच आवडत आहे.

या गाण्याची सुरुवात रितेश पांडेपासून होते. रितेश झोपेतून उठतो आणि ऑफिसला जाण्यासाठी तयार होतो. ऑफिसला निघणार इतक्यात त्याच्या बायकोच्या भूमिकेत असलेली आरोही सिंग त्याला अडवते आणि ऑफिसला न जाण्याची विनंती करते. तिच्या मते त्याने ऑफिसला न जाता घरी राहावे आणि आईबाबा बनण्याची तयारी करावी. यावर रितेश तिला खूप समजावतो आणि कामावर न गेल्यास काढून टाकतील असंही सांगतो. यावर अभिनेत्री आरोही त्याला भोजपुरीमध्ये ‘टाईम पर लडका ना होई तो सगरो कमाई का कोई…’ असं म्हणते आणि या गाण्याला सुरुवात होते. यावेळी दोघांचा अफलातून डान्स दाखवला आहे. दोघांनी सुंदर डान्स करत चाहत्यांची मने जिंकली आहेत. गाण्याच्या संगीताने सगळ्यांनाच नाचायला भाग पाडले आहे.

रितेश पांडेच्या गाण्याच्या यशामागे गायिका शिल्पी राजचाही मोलाचा वाटा आहे. कारण रितेश सोबत तिनेही हे गाणे गायले आहे. शिल्पीच्या आवाजामुळे गाणे आणखीनच मंत्रमुग्ध करत आहे. हे गाणे पिंकू बाबाने लिहले आहे. सध्या फक्त याच गाण्याची भोजपुरी चित्रपटसृष्टीत चर्चा पाहायला मिळत आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा