Saturday, August 2, 2025
Home कॅलेंडर अनुष्का, विराटला मुलगी झाल्याचे समजताच रितेशने दिली ही गोड प्रतिक्रिया, पहा त्याचा हा खास व्हिडिओ

अनुष्का, विराटला मुलगी झाल्याचे समजताच रितेशने दिली ही गोड प्रतिक्रिया, पहा त्याचा हा खास व्हिडिओ

सोमवारी अनुष्का शर्मा आणि विराट कोहली या सुंदर दाम्पत्याला कन्यारत्न प्राप्त झाले. त्यांना त्यांच्या या गोड बातमीसाठी संपूर्ण जगातून त्यांच्या फॅन्सकडून, क्रिकेटर्सकडून, कलाकारांकडून शुभेच्छा मिळत आहे. मात्र या सर्व शुभेच्छांमध्ये बॉलिवूडचा आणि मराठी चित्रपटांमधला लाडका अभिनेता रितेश देशमुखच्या शुभेच्छा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत.

रितेश मुंबईत एक कार्यक्रम संपवून बाहेर पडत असतांना, पत्रकारांनी त्याला घेरत अनुष्का, विराटच्या मुलीच्या जन्माची आनंदाची बातमी सांगितली. यावर रितेश प्रतिक्रिया देतांना म्हणाला, ” मला ही बातमी ऐकून खूपच आनंद झाला. विराट आणि अनुष्का यांना खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सर्वांचे सुद्धा खूप धन्यवाद, की तुम्ही मला ही आनंदाची बातमी दिली.” रितेशचा हा व्हिडिओ वायरल भियानी या पेजवर पोस्ट झाला असून, आता हा व्हिडिओ खूप वायरल होत आहे. रितेश क्रिकेटचा खूप मोठा चाहता आहे. त्याला अजिंक्य राहणे आणि विराट कोहली हे खेळाडू खूप आवडतात. तो वेळोवेळी त्याचे क्रिकेटप्रेमी दाखवतच असतो. शिवाय भारतीय क्रिकेट संघाच्या चांगल्या कामगिरीबद्दलही तो त्यांना शुभेच्छा देत असतो.

तत्पूर्वी अनुष्काने ११ जानेवारीला मुलीला जन्म दिला आहे. याबद्दल विराट कोहलीने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली होती. शिवाय विराटने सांगितले आहे की, “आमच्याशी संबंधित माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळेल याची आम्ही कायम काळजी घेतली आहे. पण आता आम्ही दोघं तुम्हा सगळ्यांना विनंती करतो की, तुम्ही आमच्या मुलीशी संबंधित कोणतीही माहिती अथवा फोटो काढू नका. तसेच ही सर्व माहिती आणि फोटो प्रकाशित किंवा प्रसारित करु नका. आम्हाला आशा आहे की, तुम्ही आमच्या भावनांचा आणि आमच्या खाजगी आयुष्याचा सन्मान कराल.”
अजूनपर्यंत अनुष्का आणि विराट यांच्या मुलीचा फोटो बाहेर आला नसून सोशल मीडियावर वायरल होणार फोटो फेक असल्याचे समजत आहे.

हे देखील वाचा