रितिका श्रोत्री ही मराठी सिनेसृष्टीतील प्रतिभावान कलाकारांपैकी एक आहे. याची झलक तिने माधुरी दीक्षित अभिनित ‘बकेट लिस्ट’ या मराठी चित्रपटात दाखवली आहे. या चित्रपटात तिच्या अभिनयाचे बरेच कौतुक झाले होते. ती चाहत्यांमध्ये तिच्या निरागस सौंदर्यासाठी ओळखली जाते. अभिनेत्री सोशल मीडियावर देखील बरीच सक्रिय असते. नेहमी आपले सुंदर सुंदर फोटो ती चाहत्यांसमोर सादर करत असते.
नुकतेच रितिकाने तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यांनी चाहत्यांना पुरते वेडे करून सोडले आहे. हे एकूण तीन फोटो आहेत, जे अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. यात रितिका कमालीची सुंदर दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर निरागसता सहजपणे झळकत आहे. यात तिने निळ्या रंगाच्या लेहंग्यासह पांढऱ्या रंगाचं ब्लाउज घातलं आहे. सोबतच ती फोटोसाठी दिलखुलास अंदाजात पोझ देताना दिसली आहे.
हे सुंदर फोटो शेअर करत, रितिकाने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “एवढे गंभीर कशासाठी?” तुम्ही पाहू शकता की, कशाप्रकारे चाहते फोटोवर कमेंट करून अभिनेत्रीचं कौतुक करत आहेत. कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही लाल हार्ट ईमोजीचा पाऊस पडलेला सहज पाहू शकता. तसेच या फोटोवर आतापर्यंत ५१ हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत. (ritika shrotri’s latest photos in blue lehenga goes viral)
रितिकाच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘गुंतागुंत हृदय’ या मालिकेत बालकलाकाराची भूमिका साकारून, अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर ती बऱ्याच मालिकेमध्ये दिसली. मृणाल कुलकर्णी दिग्दर्शित ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं’ या चित्रपटाद्वारे ती प्रथमच रुपेरी पडद्यावर झळकली. तसेच २०१५ साली आलेल्या ‘स्लॅमबुक’ चित्रपटात तिने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. याशिवाय रितिका लवकरच ‘डार्लिंग’ या आगामी चित्रपटात दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-आषाढी निमित्त गायक ‘जयदीप बगवाडकर’नं विठुरायाला ‘वारी नाही रे’ या गाण्याने घातली भावनिक साद
-वैदेही परशुरामी विचारतेय, ‘कॉफी घेणार का?’; व्हायरल होतेय लेटेस्ट पोस्ट