वैदेही परशुरामी विचारतेय, ‘कॉफी घेणार का?’; व्हायरल होतेय लेटेस्ट पोस्ट


आपल्या अभिनयाने आणि सुंदरतेने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजेच वैदेही परशुरामी. अभिनयाशिवाय ही अभिनेत्री नृत्य कलेतही पारंगत आहे. तिने तिच्या प्रतिभेच्या जोरावर बरेच नाव कमावले आहे. वैदेही सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय आहे. वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करून, नेहमीच ती चाहत्यांचे लक्ष वेधते. आता पुन्हा वैदेहीच्या एका व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

पावसाळ्याचे दिवस चालू आहेत. या दिवसांत सर्वात आवडीनं घेतलं जातं ते म्हणजे चहा किंवा कॉफी. अभिनेत्रीने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती कॉफीचा आस्वाद घेताना दिसली आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिच्या हातात कॉफीचा कप आहे. इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये, वैदेहीचे एक्सप्रेशन्सही अतिशय मजेदार आहेत.

हा व्हिडिओ शेअर करत ती चाहत्यांना, तुम्ही पण घेणार का असं विचारतेय. व्हिडिओच्या कॅप्शनखाली वैदेहीने लिहिलंय की, “कोणी कॉफी घेणार?” यावर आता नेटकऱ्यांनी कमेंट्स पाऊस पाडला आहे. सर्वजण तिला ‘मी घेणार मी घेणार’ असं म्हणताना दिसत आहेत. या व्हिडिओला आत्तापर्यंत ६४ हजाराहून अधिक युजर्सने पाहिलं आहे, तर यावर २५ हजाराहूनही अधिक लाईक्स आले आहेत. (vaidehi parshurami asking fans coffee anyone?)

वैदेहीच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘वेड लावी जीवा’ या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. अमिताभ बच्चन अभिनित ‘वझीर’ या हिंदी चित्रपटातही तिने काम केले आहे. याशिवाय ‘सिम्बा’मध्ये तिने रणवीर सिंगच्या बहिणीची भूमिका साकारली होती. आता अभिनेत्री लवकरच ‘झोंबिवली’ या मराठी चित्रपटात झळकणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुशांत सिंग राजपूत जगातील एकमेव नासा ट्रेंड एस्ट्रोनॉट अभिनेता होता’; बहीण श्वेता सिंग कीर्तीने केला खुलासा

-अरे बापरे! ‘इंडियन आयडल १२’मध्ये पवनदीपकडून झाली मोठी चूक; परीक्षकांच्याही उंचावल्या भुवया

-ट्रान्सफॉर्मेशन असावे तर असे! रवी दुबेने ‘इतक्या’ वेळेत कमी केले १० किलो वजन; तुम्हालाही बसणार नाही विश्वास


Leave A Reply

Your email address will not be published.