चित्रपटाच्या झगमगणाऱ्या दुनियेत अनेक कलाकार आपली छाप सोडून गेले आहेत, तर काहींना छाप सोडण्याची संधीच मिळाली नाही. मात्र, काही असेही कलाकार आहेत ज्यांना एका चित्रपटानंतर अमाप प्रसिद्धी मिळाली होती आणि त्यांच्या समोर चित्रपटासाठी अनेक प्रोजेक्ट होते. मात्र, तरीही काही दिवसांनी या अभिनेत्री कलाक्षेत्रातून हरवल्या होत्या . अशाच काही अभिनेत्रीं पैकीच रितु शिवपुरी ही एक आहे.
रितु शिवपुरी ही 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होती. तिने बॉलिवूड सुपरस्टार गोविंदा (Govinda) सोबत स्क्रीन शेअर केलेली आहे. 1993 मध्ये ऑंखे या चित्रपटात ती गोविंदासोबत मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली, या चित्रपटातील गाणे लाल दु पट्टेवाली या गाण्याने तील अमाप प्रसिद्धी मिळवून दिली होती. मात्र, या चित्रपटानंतर तिने कोणत्याच चित्रपटामध्ये काम केले नाही. तिला अनेक चित्रपट करण्याच्या संधी मिळत होत्या, पण तिने केले नाही.
आपल्या सुंदरतेने आणि अदाकारिने प्रसिद्ध असणारी अभिनेत्री रितु अगदी 17 वयाची असताना गोविंदासारख्या सुपरस्टारची हिरोईन बनण्याची संधी तिला मिळाली होती. तिला अनेक चित्रपटाच्या संधी मिळाल्या होत्या मात्र, तिला त्याचा काहीच फायदा झाला नाही. 12 वर्षानंतर तिने अभिनय क्षेत्राला राम राम ठोकला. यानंतर खूप दिवसांनी ती परतली, पण तिच्या पतीच्या आजारामुळे तिला काम करता आले नाही. तिने आपल्या पतीची सोवा करण्याचा निर्णय घेतला.
एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्री रितु शिवपुरी हिने आपल्या पतीची माहिदी देत सांगितले होते की, हरी वेंकट यांच्या पाठीमध्ये ट्युमर झाला होता. त्यामुळे तिने त्यांची काळजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. तिच्या शुटिंगच्या कामामुळे ती नेहमी व्यस्त असते त्यामुळे तिला परिवाराला वेळ देता आली नाही. त्यामुळे आता तिने कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा निर्णय घेतला आहे. रितु जरी अभिनय क्षेत्रापासून लांब असली तरी ती सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. सोशल मीडियावर तिचा मोठा चाहता वर्ग आहे. लोक तिला आजही विसरले नाहीत. ती आजही आपल्या चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘जस्सी’ म्हणून झाली लोकप्रिय, तर अश्लील एमएमएस लीक झाल्यामुळे मोना सिंग सापडली होती वादात
सुष्मितापासून ते शाहिदपर्यंत, ‘हे’ दिग्गज कलाकार ओटीटीवर वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज, यादी पाहाच