×

दुःखद: ‘या’ लोकप्रिय रेडिओ जॉकीचे हृदयविकाराच्या धक्क्यामुळे निधन, मान्यवरांनी वाहिली सोशल मीडियावरून वाहिली श्रद्धांजली

काही दिवसांपूर्वी सुरु झालेले २०२२ हे नवीन वर्ष मनोरंजनविश्वासाठी खूपच सुखदायी ठरत आहे. अनेक दिग्गजांनी यावर्षी सर्वांचा निरोप घेतला. अगदी रमेश देव, लता मंगेशकर, बप्पी लहिरी आदी अनेक कलाकारांनी आपली साथ सोडली. आता पुन्हा एकदा मनोरंजनविश्वातून एक दुःखद बातमी समोर येत आहे. लोकप्रिय आरजे अर्थात रेडिओ जॉकी रचनाचे नुकतेच बंगळुरूमध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. रचना ही कन्नड भाषेतील अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय आरजे होती. सामान्य लोकांपासून ते कलाकार, नेते सर्वांमध्ये तिची कमालीची लोकप्रियता होती. वयाच्या केवळ ३९ व्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला. तिच्या या अचानक घेतलेल्या एक्सिटमुळे संपूर्ण कर्नाटकमध्ये दुःखाची लाट पसरली असून अनेकांनी तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.

रचना २२ फेब्रुवारी रोजी तिच्या जेपी नगरस्थित आपल्या घरात असताना अचानक तिला छातीत दुखू लागले. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तोपर्यंत तिचे निधन झाले होते. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार तिला हृदयविकाराचा तीव्र धक्का आल्याने तिचे निधन झाले. रचनाने खूपच कमी वयात चांगलीच लोकप्रियता मिळवली होती. तिची फॅन फॉलोविंग देखील खूपच मोठी होती. प्रत्येकाला अगदी हवाहवासा वाटणारा तिचा आवाज आता कायमचा बंद झाला आहे, हे सत्य कोणीच पचवू शकत नाही.

बंगळुरूमधील बीजेपीचे खासदार असलेल्या पीसी मोहन यांनी ट्विटरवर रचनांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना लिहिले, “लोकप्रिय आरजे असणाऱ्या रचनांच्या निधनामुळे स्तब्ध आणि दुखी झालो आहे. #RJRachana मागील जवळपास एक दशकापासून आपल्या उत्तम सेन्स ऑफ ह्यूमरमुळे तिने बंगलोरवासियांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण केली, तिचे नाव प्रत्येक घरात पोहचले होते. देव तिच्या कुटुंबाला, चाहत्यांना आणि जवळच्या लोकांना शक्ती देवो. ओम शांती.” आरजे रचनाने तिच्या आवाजाने संपूर्ण बंगलोरमध्ये एक वेगळीच ओळख निर्माण केली होती.

कन्नड अभिनेत्री असलेल्या श्वेता चैंगप्पाने इंस्टाग्रामवर लिहिले, “ती माझी आवडती आरजे होती. खूपच समजुदार आणि भाषेवर तिची पकड खूपच मजबूत होती. मी कधीही तिला भेटली नाही. खूपच निराश वाटत आहे, कारण आता यापुढे तिला मला भेटता येणार नाही. ती नाही ही भावना खूपच दुखी करत आहे.” सोशल मीडियावर आरजे रचनाला चाहत्यांनी आणि कलाकारांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. अनेक कन्नड कलाकरांनी आरजे रचनाला श्रद्धांजली वाहिली आहे.

हेही वाचा –

बुरखा घालून चित्रपट पाहायला गेलेल्या माधुरी दीक्षितला ‘या’ कारणामुळे अर्धवट चित्रपट सोडत काढावा लागला होता पळ

Latest Post