Friday, January 16, 2026
Home कॅलेंडर रोहित शेट्टी आणि रणवीर सिंगची जोडी पुन्हा एकदा दिसणार मोठ्यापड्यावर

रोहित शेट्टी आणि रणवीर सिंगची जोडी पुन्हा एकदा दिसणार मोठ्यापड्यावर

दिग्दर्शक रोहित शेट्टी आपल्या नव्या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा लोकांना वेड लावायला तयार आहे. ‘द कॉमेडी ऑफ एरर्स’ या गाजलेल्या नाटकावर आधारित ‘सर्कस’ नावाचा सिनेमा रोहित शेट्टी आपल्या चाहत्यांसाठी घेऊन येत आहेत.

सिम्बाच्या प्रचंड यशानंतर आणि सूर्यवंशीमध्ये छोट्या भूमिकेत दिसल्यानंतर रोहित शेट्टी आणि रणवीर सिंगचा हा तिसरा चित्रपट असणार आहे. या चित्रपटामध्ये भव्य स्टारकास्ट असून यात पूजा हेगडे, जॅकलिन फर्नांडिज, वरुण शर्मा, सिद्धार्थ जाधव, जॉनी लीव्हर, संजय मिश्रा, व्रजेश हिरजी, विजय पाटकर, सुलभा आर्य, मुकेश तिवारी, अनिल चरणजीत, अश्विनी काळसेकर आणि मुरली शर्मा यांचा समावेश आहे.

सर्कसचे शूटिंग पुढच्या महिन्यात सुरु होणार असल्याचे समजते आहे. या चित्रपटाचे मुंबई, ऊटी आणि गोव्यात चित्रीकरण करण्यात येईल. हा चित्रपट २०२१ च्या हिवाळ्यात प्रदर्शित होणार आहे.

हे देखील वाचा