Sunday, June 8, 2025
Home बॉलीवूड अर्रर्रर्र! अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’मध्ये रोहित शेट्टीकडून झाली मोठी चूक, ट्रोलर्सने साधला निशाणा

अर्रर्रर्र! अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’मध्ये रोहित शेट्टीकडून झाली मोठी चूक, ट्रोलर्सने साधला निशाणा

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ चित्रपट रिलीझ झाल्यापासून धमाल करत आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट चांगली कमाई करत आहे. पण दरम्यान, चित्रपट आणि रोहित शेट्टीला यातील काही सीनमुळे ट्रोल केले जात आहे.

एका यूजरने ट्वीट केले की, ‘सिम्बामध्ये जो खलनायकाचा भाऊ बनला होता, सूर्यवंशीमध्ये तो दहशतवाद विरोधी पथकाचा अधिकारी बनला आहे आणि यांना अ‍ॅव्हेंजर्ससारखे विश्व निर्माण करायचंय.” यासोबत त्याने ‘आरआयपी लॉजिक’ असेही लिहिले आहे. (rohit shetty is getting troll for akshay kumar and katrina kaif starrer sooryavanshi few scenes)

वास्तविक, ‘सूर्यवंशी’मध्ये दहशतवादविरोधी पथकाच्या अधिकाऱ्यासारखी महत्त्वाची आणि जबाबदार व्यक्तिरेखा साकारणारा हा अभिनेता, रणवीर सिंगच्या ‘सिम्बा’ चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या सोनू सूदचा भाऊ बनला होता. पूर्वी खलनायक बनलेला व्यक्ती दुसऱ्या चित्रपटात अधिकारी का झाला, हे चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे.

चित्रपटाचा आणखी एक सीन खूप ट्रोल होत आहे, ज्यामध्ये अक्षय कुमार छतावरून खाली उडी मारताना दिसत आहे. हा सीन सलमान खानच्या ‘एक था टायगर’ या चित्रपटाची कॉपी असल्याचे म्हटले जात आहे. ‘एक था टायगर’ या चित्रपटातही सलमान अशीच ऍक्शन करताना दिसला होता. त्यामुळे रोहित शेट्टी आणि अक्षय कुमार यांना ट्रोल केले जात आहे.

एकीकडे काही सीनमुळे हा चित्रपट ट्रोल होत आहे, तर दुसरीकडे या चित्रपटाला प्रेक्षक आणि समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी चांगली कमाई केली असून, ३ दिवसात चित्रपटाने ७५ कोटींहून अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट पाहून चित्रपटगृहांमध्ये टाळ्यांचा कडकडाट होत आहे.

या चित्रपटातील अक्षय आणि कॅटरिनाची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. शिवाय रणवीर सिंग आणि अजय देवगणचा कॅमिओही खूपच मजेशीर आहे. बऱ्याच दिवसांपासून या चित्रपटाची वाट पाहत असलेल्या चाहत्यांच्या अपेक्षांवर हा चित्रपट खरा ठरला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अक्षय कुमारच्या ‘सूर्यवंशी’ला रजनीकांत यांचा ‘अन्नाथे’ चित्रपट देतोय जबरदस्त टक्कर, पाहा दोन्ही चित्रपटांची कमाई

-दुसऱ्या दिवशीही ‘सूर्यवंशी’ची बंपर कमाई! दोन दिवसांत केला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

-‘सूर्यवंशी’च्या प्रदर्शनानंतर नवीन गाणे लॉन्च, पाहायला मिळाली अक्षय कुमार अन् कॅटरिना कैफची दिलखेचक केमिस्ट्री

हे देखील वाचा