Saturday, March 2, 2024

प्रिमियरनंतर काही तासांतच ऑनलाइन लिक झाली इंडियन पोलिस फोर्स, या साइटवरून करु शकता डाउनलोड

रोहित शेट्टीची बहूप्रतिक्षित वेब सिरीज ‘इंडियन पुलिस फोर्स’ओटीटी प्लॅटफाॅर्म प्राइम वीडियोवर स्ट्रीम होत आहे. या सिरीजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी-कुंद्रा, आणि विवेक ओबेराॅय(Actor Vivek Oberoi) या कलाकारांनी मुख्य भुमिका साकारली आहे. यांच्या व्यतिरिक्त ईशा तलवार, निकितिन धीर आणि श्वेता तिवारी यांनीही महत्वाच्या भुमिका साकारल्या आहेत. या वेबसिरीजला स्ट्रीमिंगनंतर प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद येत आहेत. दरम्यान निर्मात्यांसाठी एक झटका देणारी बातमी येत आहे. त्याचं झालं असं की, ‘इंडियन पुलिस फोर्स’च्या मियरनंतर काही तासांतच ही सिरीज ऑनलाइन लिक झाली आहे.

इंडियन पोलिस फोर्स झाली ऑनलाइन लिक
‘इंडियन पुलिस फोर्स’(indian police force)आज ओटीटी प्लॅटफाॅर्म प्राइम वीडियोवर स्ट्रीम झाली आहे. तरी रोहित शेट्टीची ही सिरीज तिच्या प्रिमियरनंतर काही तासांतच पायरसीची शिकार बनली आहे. बाॅलिवूड लाइफच्या रिपोर्टनुसार ‘इंडियन पुलिस फोर्स’ फुल एचडी प्रिंंटमध्ये अनेक टोरेंट साइट्सवर जसं की, टेलीग्राम, तमिळ राॅकर्स, फिल्मीरॅप, ऑनलाइनसिरीजवाॅच, 123सिरीज, 123 सिरीजरूलस,फिल्मीजिला, यावर फ्रीमध्ये डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहेत.

इंडियन पुलिस फोर्सला मिळाला ऑडियन्सचा संमिश्र प्रतिसाद
‘इंडियन पुलिस फोर्स’ वेबसिरीजला स्ट्रीमिंगनंतर प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. काही प्रेक्षकांना या सिरीजमधील ऍक्शन सीन आणि परफाॅरमंस खुप आवडला तर काहींना परफाॅरमंस कंटाळवाना वाटला आहे.विशेष म्हणजे रोहित शेट्टीची(rohit shetty) ही पहिलीच वेबसिरीज आहे.

काय आहे इंडियन पुलिस फोर्सची कथा
‘इंडियन पुलिस फोर्स’ सिरीज ही दिल्ली पोलिसफोर्समधील अधिकारी कबीर मलिकवर आधारित आहे. जो घातक आतंकवादी जरारशी लढण्यासाठी मिशनवर जातो. देशाच्या सुरक्षेसाठी कबीरने जरारचा पाठलाग कसा केला, त्याला काय बलिदान द्यावे लागले? या थ्रीलींग पटकथेमध्ये हे सर्व दाखवण्यात आले आहे.

इंडियन पुलिस फोर्सचे स्टारकास्ट
लेटेस्ट वेब-सीरीज ‘इंडियन पुलिस फोर्स’मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा(actor Siddharth malhotra), विवेक ओबेरॉय, शिल्पा शेट्टी कुंद्रा(shilpa shetty), शरद केळकर, ईशा तलवार, मयंक टंडन, मुकेश ऋषि, ऋतुराज सिंह, मृणाल कुलकर्णी, श्वेता तिवारी, निकितिन धीर, वैदेही परशुरामी, प्रदीप काबरा, सुचित्रा बांदेकर, विपुल देशपांडे, ललित परिमू, करणवीर मल्होत्रा, आणि सूरज ओहरी यांनी महत्वाच्या भुमिका साकारल्या आहेत.
ही वेब सिरीज रोहित शेट्टी, संदिप साकेत, अनुषा नंदकुमार, आयुष त्रिवेदी, विधी घोडगावकर, संचित बेद्रे यांनी लिहिली आहे आणि रोहित शेट्टी आणि सुशांत प्रकाश हे या ऍक्शन थ्रिलर सिरीजचे दिग्दर्शक आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

2023 ची आठवण काढत सोनम कपूर झाली भावूक; पतीच्या आजाराचा खुलासा करत म्हणाली, ‘गेले वर्ष चढ-उतारांनी भरलेले’
आयुष्मान खुराणाला लागले अकादमी पुरस्काराचे वेध, सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल

हे देखील वाचा