Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘खेळकर क्षण…’ म्हणत रोनित रॉयने श्वेतासोबतचा ‘तो’ फोटो केला शेअर; नेटकरी म्हणाले, ‘वाट…’

रोनित रॉय आणि श्वेता तिवारी ही छोट्या पडद्यावरील सर्वोत्तम कलाकार आहेत. 2001मध्ये प्रदर्शित झालेल्या प्रसिद्ध टेलिव्हिजन शो ‘कसौटी जिंदगी की’ मध्ये त्यांनी मिस्टर बजाज आणि प्रेरणा यांची भूमिका साकारली होती. या शोमुळे त्यांना अमाप लोकप्रियता मिळाली. त्यांच्यातील केमिस्ट्रीवर प्रेक्षकांची खूप प्रेम होते. या शोमध्ये, मिस्टर बजाज हे एक श्रीमंत आणि शक्तिशाली उद्योगपती होते, तर प्रेरणा एक गरीब आणि निर्दोष मुलगी होती. त्यांच्यात वयाचा आणि सामाजिक स्थितीचा मोठा फरक असला तरीही, त्यांच्यात प्रेम निर्माण झाले होते.

या शोमधील त्यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यांच्यातील केमिस्ट्री अजूनही खूप लोकप्रिय आहे. रोनित रॉय (Ronit Roy) आणि श्वेता तिवारी यांनी पुन्हा एकत्र एक फोटोशूट केला. या फोटोशूटने त्यांच्या चाहत्यांना खूप उत्साहित केले. चाहते त्यांच्या पुन्हा एकत्र काम करण्याची आशा करत आहेत. रोनित रॉय आणि श्वेता तिवारी ही भारतीय टेलिव्हिजनची एक आदर्श जोडी आहे. त्यांच्यातील केमिस्ट्री नेहमीच प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करते.

रोनित रॉय सोशल मीडियावर सतत सक्रिय असतो. तो सतत त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याने नुकतेच काही फोटो शेअर केले आहे. रोनित रॉयने त्याच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर अभिनेत्री श्वेता तिवारीसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघेही रोमँटिक पोज देताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ronit Roy (@ronitboseroy)

 हे फोटो शेअर करताना रोनितने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आपल्या उत्कटतेचा सुगंध आपल्या हृदयाची कहाणी सांगते. रोमांसच्या या खेळकर क्षणांमध्ये आमच्यासोबत गुंतून रहा. संपर्कात रहा!” शेअर केलेल्या फोटोमध्ये श्वेता खूपच सुंदर दिसत आहे. तीने लाल रंगाची साडी परिधान केली आहे. तिचा हा लूक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

त्यांच्या या फोटोवर चाहत्यांनी अनेक लाईक आणि कमेंट केल्या आहेत. यावर कमेंट करताना एकाने लिहिले की, “वाट पाहत आहे.” दुसऱ्याने लिहिले की, “प्रेरणा आणि श्री. बजाज तेव्हापासून….आतापर्यंत….काय केमिस्ट्री.” (Ronit Roy and Shweta Tiwari photos are viral on social media)

आधिक वाचा-
‘फुकरे 3’ची शाहरुखच्या ‘जवान’ला जबरदस्त टक्कर; केली ‘इतक्या’ कोटींची कमाई
हेमलचा झक्कास लूक, फोटो पाहून तुम्हीही व्हाल घायाळ

हे देखील वाचा