Friday, July 5, 2024

वस्त्रहरणाचा सीन दिल्यानंतर अर्धा तास रडत होत्या रूपा गांगुली, अशाप्रकारे शूट झाला सीन

टेलिव्हिजन इतिहासात बी. आर. चोप्रा यांची ‘महाभारत’ ही अशी एक मालिका आहे, जी अजूनही प्रेक्षकांच्या मनात तशीच आहे. दूरदर्शनवर ९०च्या दशकात ‘रामायण’ नंतर जर प्रेक्षकांना दुसरी कोणती मालिका आवडली असेल, तर ती ‘महाभारत’. महाभारतातील प्रत्येक पात्राची एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. मालिकेतील नकारात्मक भूमिकेत असणाऱ्या पात्रांना देखील खूप प्रेम मिळाले. यातील द्रौपदी हे पात्र खूप गाजले होते. यात जेव्हा वस्त्रहरणाचा सीन शूट होत होता, तेव्हा या मालिकेत द्रौपदीच्या भूमिकेत असणाऱ्या रूपा गांगुली देखील रडत होत्या. रूपा गांगुली शनिवारी (२५ नोव्हेंबर) त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे. त्यांचा जन्म २५ नोव्हेंबर १९६६ मध्ये झाला. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया ‘महाभारता’मधील वस्त्रहरणाचा सीन कशाप्रकारे शूट झाला होता.

Photo Courtesy: ScreenGrab/YouTube/pen bhakti

रूपा यांनी द्रौपदीचे हे पात्र खूप चांगल्या पद्धतीने निभावले होते. त्यांना वस्त्रहरणाचा सीन शूट केला जाणार आहे असे सांगितले गेले. यावेळी बी.आर. चोप्रा यांनी रुपा यांना सांगितले की, “जर एखाद्या महिलेला भर सभेत तिचे केस धरून ओढत आणतात आणि तिचे वस्त्रहरण करतात त्यावेळी ती महिला काय विचार करत असेल, ती कोणत्या परिस्थितीतून जात असेल फक्त एवढाच विचार करून हा सीन दे.” हे ऐकून रूपा खूप घाबरल्या होत्या. (roopa ganguly birthday, she kept crying for half an hour after the shoot of mahabharat)

https://youtu.be/RajCJUdEDH8

रूपा यांनी एकाच टेकमध्ये हा पूर्ण सीन दिला होता. त्यांनी हा सीन इतक्या चांगल्या पद्धतीने केला की, दिग्दर्शकाला एकही टेक पुन्हा घ्यावा लागला नाही. हा सीन पूर्ण झाल्यांनतर रूपा अर्धा तास रडत होत्या. त्यांच्यासाठी हा सीन देणे खूप अवघड होते. एका महिलेच्या त्या भावना प्रेक्षकांसमोर मांडणे खूप अवघड गोष्ट होती. परंतु हिंमतीने त्यांनी हे करून दाखवले. हा सीन करण्यासाठी त्यांनी १५० मीटर लांब असलेली साडी मागवली होती. जेणेकरून एकाच टेकमध्ये हा सीन पूर्ण व्हावा. हा सीन करण्यासाठी रुपा यांना कितीतरी गोल वेढे मारावे लागले होते.

रूपा यांच्याआधी ही भूमिका जुही चावलाला मिळाली होती. एवढंच नाहीतर तिने अग्रीमेंट देखील केले होते. परंतु तेव्हाच तिचा ‘कयामत से कयामत’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि तिने द्रौपदीचे पात्र निभावण्यास नकार दिला. त्यानंतर या भूमिकेसाठी रूपा गांगुली यांना विचारले गेले. त्यांनी लगेच यासाठी होकार दर्शवला. त्यांनी हे पात्र खूप चांगले निभावले आणि त्यांचे मनोरंजनविश्वात एक वेगळे स्थान निर्माण केले.

हेही नक्की वाचा-
गुप्तहेराच्या भूमिकेत आलिया भट्ट कितपत शोभेल? इमरान हाश्मीच्या कमेंटने वाढवली खळबळ
नेहा मलिकचा कडक लूक; PHOTO पाहून डोळे फिरतील

हे देखील वाचा