फेब्रुवारी महिना सुरु होऊन जेमतेम ७-८ दिवस झाले आहेत. थंडी कमी होऊन भारतात या दिवसांत उन्हाळा सुरु होण्यास सुरुवात होते. हाच फेब्रुवारी महिनासमस्त तरुण वर्गात प्रसिद्ध असण्याचे कारण म्हणजे या महिन्यात येणार डेज. अगदी रोझ डे पासून ते व्हॅलेंटाईन डे पर्यंत सगळे डेज सेलिब्रेशन करताना तरुणांमध्ये उत्साह दिसतो.
प्रेमविरांसाठी तर हा महिना खूपच खास असतो. संपूर्ण जगात 14 फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ साजरा केला जातो. त्याच्या आधी 14 फेब्रुवारीपर्यंत आठवडाभर वेगवेगळे डेज साजरे केले जातात. त्याची सुरवात ‘रोझ डे’ पासून होते.
प्रेम आणि आपलं बॉलीवूड वेगळं करण तसं अशक्यच. फेब्रुवारी महिन्यात हे जे डेज साजरे होतात, त्यांचा प्रचार-प्रसार करण्याचं काम अनेक बॉलीवूड सिनेमांमधून अविरत झालं आहे. प्रेयसीला फूल देऊन प्रपोज करण्याच तंत्रही याच बॉलीवूडने आपल्याला शिकवलंय. अशाच या बॉलीवूडकरांच्या काही खास गाण्यांचा हे प्रेमाच्या दिवासांचे औचित्य साधून आस्वाद आपण घेणार आहोत. प्रेमवीरांसाठी काही खास गाणी टीम बोंबाबोंबने शोधली आहेत. चला तर मंडळी एक एक करुन ही गाणी माहित करुन घेऊयात, ऐकूयात व दिवसभर गुणगुणूयात…
गाणे: फूल मांगू ना बहार मांगू
चित्रपट: राजा (1995)
1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या राजा या चित्रपटातील ‘फूल मांगू ना बहार मांगू’ हे गाणे त्या काळात खूपच लोकप्रिय झाले होते. प्रेक्षकांकडून या गाण्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. हे गाणे ‘अलका याज्ञिक’ आणि ‘उदित नारायण’ यांनी गायले होते.’नदीम श्रवण’ यांच्या या गाण्याची जादू तरुणांवर अशी चढली की या गाण्याला खूपच लोकप्रियता त्या काळात मिळाली होती.
गाणे: बहरों फूल बरसा ओ मेरा बेहबूब आया है
चित्रपट : सूरज ( 1966)
1966 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सूरज’ या चित्रपटातील हे गाणे खूपच चर्चेत आले होते. या गाण्याला ‘मोहम्मद रफी’ यांनी गायले आहे. या चित्रपटात वैजयंती माला, राजेंद्र कुमार, मुमताज आणि अजित खान यांनी मुख्य भूमिका निभावली होती. हे गाणे वैजयंती माला आणि राजेंद्र कुमार यांच्यावर चित्रित झाले होते.
गाणे : फूल गुलाब का
चित्रपट: बीवी हो तो ऐसी( 1988)
1988 मध्ये प्रदर्शित झालेला लोकप्रिय चित्रपट म्हणजे बीवि हो तो ऐसी. या चित्रपटाचं ‘फूल गुलाब का’ हे गाणं घराघरात ऐकलं गेलं होतं. मोहम्मद अजीज आणि अनुराधा पौडवाल यांनी हे गाणे गायले होते. हे गाणे अभिनेत्री रेखा आणि फरुख शेख यांच्यावर चित्रित केले आहे. हे गाणे देखील त्या काळात खूपच गाजले होते.
गाणे : आओगे जब तुम ओ साजना
चित्रपट : जब वी मेट (2007)
इम्तीयाज अली यांचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘जब वी मेट’ हा कोणीच विसरू शकत नाही. 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ह्या चित्रपटाने बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये आपली एक वेगळीच छाप सोडली होती. या गाण्याला प्रेक्षकांकडून खूपच प्रेम मिळाले होते आणि सगळयात महत्वाचं म्हणजे या चित्रपटात दाखवलेले करिना आणि शाहिद हे दोघेही त्या वेळी रिलेशनशीपमध्ये होते. ‘आओगे तुम जब वो साजना’ हे गाणं 2007 मधील सर्वात ऐकलं व पाहिलं गेलेलं नंबर एक गाणं होतं.
हेही वाचा-
–भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाच्या पिरितीया के बानी पियासल गाण्याची कमाल; मिळाले ३० लाखांपेक्षाही जास्त व्ह्यूज
–विक्रमांचा विक्रम! भोजपुरी गायकाच्या गाण्याने केला विक्रम, तब्बल २५ कोटी हिट्स मिळवत केला नवा रेकॉर्ड
–व्हिडीओ शेअर करत अंकिताने इंटरनेटवर वाढवली धकधक, तरीही चाहत्यांनी घेतले फैलावर
–ढोलकीच्या तालावर थिरकले पद्मिनी कोल्हापुरे आणि मुलगा प्रियांकचे पाय; पाहा जबरदस्त डान्स
–मैं तेरा बॉयफ्रेंड गाण्यावर जेनेलियाने मुलांसोबत केली मजामस्ती; व्हिडिओला मिळाले ५ लाखांपेक्षा अधिक लाईक्स