Friday, September 20, 2024
Home टॉलीवूड बाप रे! ‘या’ चित्रपटाने मोडला ‘बाहुबली दोन’चा विक्रम, रिलीजपूर्वीच केली तब्बल ३५० कोटींची कमाई

बाप रे! ‘या’ चित्रपटाने मोडला ‘बाहुबली दोन’चा विक्रम, रिलीजपूर्वीच केली तब्बल ३५० कोटींची कमाई

दक्षिण भारतातील राज्यांमध्ये एसएस राजामौलीच्या आगामी चित्रपट ‘आरआरआर’ (RRR) प्री-रिलीजपुर्वीच एक शानदार विक्रम करणार आहे. दक्षिणेचे दोन मोठे स्टार काम करत असलेल्या या चित्रपटाने प्री-रिलीजपुर्वीच ‘बाहुबली दोन’चा मोठा विक्रम मोडला आहे. ज्युनियर एनटीआर (Jr.NTR) आणि राम चरणसारखे दिग्गज अभिनेते या सिनेमात काम करत आहेत.

अभिजात दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी जानेवारी 2021 मध्ये जाहीर केले होते की, त्यांच्या दिग्दर्शिनाखाली ‘आरआरआर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. 13 ऑक्टोबरला 2021ला दसऱ्यानिमित्त हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या घोषणेने अचानक उत्तर आणि दक्षिणे भारतातील चित्रपट व्यवसायात मोठा उत्साह निर्माण झाला आहे.

माध्यमांतील काही वृत्तानुसार, 1900च्या काळावर चित्रीत होणाऱ्या या चित्रपटासाठी मोठ्या प्रमाणावर वितरण हक्कासाठी ऑफर येत आहे. केवळ दक्षिण भारतात वितरण हक्काचे जे प्रस्ताव आले आहेत, त्यांचे मिळूनच तब्बल ३४८ कोटी रुपये प्रीृरिलीजपुर्वी चित्रपट निर्मात्यांना मिळणार आहेत. ही रक्कम केवळ तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम या चारच भाषांतील वितरकांकडून मिळणार आहे. ही तेलगु सिनेमा सृष्टीतील कोणत्याही सिनेमाला प्री-रिलीजपुर्वी मिळालेली सर्वात मोठी ऑफर असून आरआरआर सिनेमाने बाहुबली दोनला याबाबतीत मागे टाकले आहे. बाहुबली दोन सिनेमाने प्री-रिलीजपुर्वी २१५ कोटींची कमाई केली होती.

हिंदी भाषेतील वितरणाचे हक्क एए फिल्म्स (अनिल थडानी) यांना मिळाले असून ते कमिशनच्या आधारे त्यांनी विकत घेतले आहेत. या वितरणातून जवळपास १०० कोटींची निर्मात्यांना मिळण्याची अपेक्षा आहे. या चित्रपटाचे विदेशातील हक्क यापुर्वीच फार्स फिल्मला तब्बल ७० कोटींना विकण्यात आले आहेत.

आतापर्यंतच्या सर्व हक्कांच्या विक्रीतून निर्मात्यांना जवळपास ५०० कोटी रुपयांची अपेक्षा आहे. एसएस राजामौलींचा हा पहिलाच असा सिनेमा असेल, ज्याने प्रदर्शानापुर्वीच असा विक्रम केला आहे.

असे विकले जाणार आरआरआर चित्रपटाचे हक्क-

तेंलगणा (७५ कोटी), आंध्र प्रदेश (१६५ कोटी), तामिळनाडू (४८ कोटी), मल्याळम (१५ कोटी), कन्नड (४५ कोटी) व परदेशातील हक्क (७० कोटी)

आरआरआरबद्दल थोडक्यात-

आरआरआर हा एक पिरीयड ऍक्शनपट आहे, ज्यात प्रसिद्ध स्वातंत्र्यसेनानी कोमारम भीमा आणि अल्लुरी सितारामाराजू यांच्या तरुण दिवसांचे काल्पनिक चित्रण दाखविण्यात येणार आहे. हा चित्रपट दसऱ्याच्या मुहूर्तावर अर्थात १३ ऑक्टोबर रोजी संपुर्ण जगात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट डीव्हीव्ही दानय्या यांच्या डीव्हीव्ही एन्टरटेन्मेंट बॅनरखाली बनणार असून तो तेलुगु, हिंदी, तमिळ, मल्याळम, कन्नड आणि इतर अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा-

‘न्यूड’ फोटोच्या मागणीला अभिनेत्री पूजा हेगडेची जबरदस्त प्रतिक्रिया; एकदा पाहाच

“‘केजीएफ: चाप्टर २’ केवळ चित्रपट नाही तर…”, चाहत्याचे पंतप्रधान मोदींना पत्र; सोशलवर भन्नाट व्हायरल

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा