Friday, August 1, 2025
Home कॅलेंडर जय हो..! कोट्यवधी भारतीयांना गुडन्यूज, आरआरआर चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला मिळाला मानाचा ऑस्कर पुरस्कार

जय हो..! कोट्यवधी भारतीयांना गुडन्यूज, आरआरआर चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला मिळाला मानाचा ऑस्कर पुरस्कार

कोट्यवधी भारतीयांसाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाने मान उंचावणारी बातमी समोर आली आहे. 95 व्या ऑस्कर पुरस्कार ( Oscars 2023 ) सोहळ्यात भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. आरआरआर ( RRR ) या चित्रपटातल्या ‘नाटू नाटू’ ( Natu Natu ) या गाण्याला ‘बेस्ट ओरिजनल साँग’चा ( Best Original Song ) ऑस्कर पुरस्कार ( Awards ) मिळाला आहे. भारतीय प्रोडक्शनमध्ये बनलेलं हे पहिलं गाण आहे ज्याला ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे.

24 मार्च 2022 रोजी प्रदर्शित झालेल्या आरआरआर या चित्रपटातील नाटू नाटू हे गाणं सिनेमा प्रदर्शीत झाल्यापासूनच प्रचंड चर्चेत आलं. वेगवेगळ्या भाषांमध्ये त्याचा अनुवाद करून देखील ते प्रदर्शित करण्यात आलेस आहे. या गाण्याचे बोल चंद्रबोस यांनी लिहिले असून एम.एम. किरवानी यांनी त्याला संगीतबद्ध केलं आहे. कालभैरव आणि राहुल सिप्लीगुंज या दोन पार्श्वगायकांनी हे गीत गायले आहे. या गाण्यावरील चित्रीकरणही वैशिष्ट्यपूर्ण असून त्याची नृत्यशैली तुफान लोकप्रिय झाली आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
– ‘या’ भारतीय कलाकृतीने पटकावला २०२३ सालातला पहिला ऑस्कर पुरस्कार
– दिग्गजांविरुद्ध मिटू कॅम्पेनमध्ये उतरणाऱ्या अभिनेत्रीच्या जीवाला धोका, इंस्टाग्राम पोस्ट करून उडवली खळबळ

 

हे देखील वाचा