Sunday, August 3, 2025
Home साऊथ सिनेमा देवमाणूस! मरणाच्या दारात असलेल्या चाहत्यासाठी धावला ज्युनिअर एनटीआर, सर्वत्र होतंय कौतुक

देवमाणूस! मरणाच्या दारात असलेल्या चाहत्यासाठी धावला ज्युनिअर एनटीआर, सर्वत्र होतंय कौतुक

ज्युनियर एनटीआर (jnr. NTR) हा दक्षिणात्य सिने जगतातील  सर्वाधिक मानधन घेणारा कलाकार म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयासाठी तर तो लोकप्रिय आहेच त्याचबरोबर तो आपल्या चाहत्यांसाठी काहीही करायला तयार असतो. एनटीआरचे फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे. चाहते त्याच्यावर त्यांचे प्रेम दाखवण्यात आणि त्याला तितकेच प्रेम करण्यास कोणतीही कसर सोडत नाहीत. सध्या सुपरस्टार ज्युनियर एनटीआरच्या जनार्दन नावाच्या डाय हार्ड फॅनची प्रकृती गंभीर आहे आणि त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एनटीआरला ही बातमी कळताच त्यांनी चाहत्यांच्या आईला फोन केला आणि तिच्या मुलाला लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर, अभिनेत्याचा त्याच्या चाहत्याच्या आईशी बोलत असलेल्या फोन कॉलचा व्हिडिओच नाही तर नंबरही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ज्युनियर एनटीआरच्या चाहत्यांप्रती असलेली उदारता पाहून त्याचे चाहते आश्चर्यचकित आणि आनंदी आहेत. कोणीतरी RRR स्टारच्या फोन कॉलचा व्हिडिओ बनवला आणि तो इंटरनेटवर टाकला, जो वामसी काकांनी ट्विटरवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिले की,”त्याचा चाहता जनार्दनची तब्येत गंभीर असल्याचे ऐकून तारकने क्षणाचाही विलंब न लावता लगेच आईला फोन केला. एनटीआरनेही जनार्दन यांच्याशी स्पीकरवर कॉल करून त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पीडितेची आई भावूक होऊन एनटीआरकडे तिच्या वेदना व्यक्त करत आहे. सध्या अभिनेत्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये प्रेक्षकांच्या नजरा एनटीआरच्या बोलण्यापेक्षा डिस्प्लेवर दिसणाऱ्या फोन नंबरवर जास्त आहेत. ज्युनियर एनटीआर ज्या फोन नंबरवरुन  बोलत होता तो व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होता, त्यामुळे सर्वांनी तो लगेच सेव्ह केला आणि आता प्रत्येकजण तो डायल करत आहे. सुरक्षेसाठी फोन कॉलचा नंबर अस्पष्ट असावा असे अभिनेत्याच्या चाहत्यांचे मत आहे. पण जो नंबर दिसत होता तो एनटीआरच्या नावावर नसून एनटीआर आर्ट्सच्या नावावर असल्याचेही बोलले जात आहे.

हेही वाचा-

रोमान्स रोमान्स आणि फक्त रोमान्स! निरहुआ अन् आम्रपालीचं ‘हे’ गाणं पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

‘जेव्हा स्री कडकलक्ष्मीचं रूप घेते’, सोनाली कुलकर्णीने शेअर केलेली ‘ती’ पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत

‘या’ कॉमेडीयनने बिल्डरला लावला २० लाखांचा चुना, पोलिसांनी पाठवली नोटीस

 

 

हे देखील वाचा