भोजपुरी सिनेसृष्टीत सर्वात आवडत्या जोडींमध्ये अव्वलस्थानी नाव घेतले जाते, ती जोडी म्हणजे दिनेश लाल यादव म्हणजेच निरहुआ आणि आम्रपाली दुबे ही होय. या जोडीने आतापर्यंत अनेक सिनेमात एकत्र काम केले आहे. या जोडीला खूप मोठा चाहतावर्ग लाभला आहे. या जोडीला एकत्र पाहणे चाहत्यांना खूप आवडते. इतकेच नाही, त्यांची सिनेमातील गाणीही खूप गाजतात. अशातच त्यांचे एक गाणे सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. निरहुआ आणि आम्रपालीचे हे रोमँटिक गाणे आहे.
दिनेश लाल यादव निरहुआ (Dinesh Lal Yadav Nirahua) आणि आम्रपाली दुबे (Amrapali Dubey) यांच्या व्हायरल होत असलेल्या गाण्याचे नाव ‘तोहार आदत हो रहल बा’ असे आहे. हे गाणे मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘रोमियो राजा’ या सिनेमातील आहे. या सिनेमात या दोघांच्या जोडीने धमाल केली, जी त्यांच्या चाहत्यांना फारच भावली. या सिनेमातीलच हे गाणे आता व्हायरल होत आहे. या गाण्यात अभिनेता निरहुआ आम्रपालीकडे आपले प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. इतकेच नाही, तर दोघांच्याही रोमँटिक केमिस्ट्रीने गाण्याची मजा आणखी वाढवली आहे.
निरहुआ आणि आम्रपाली दुबेचे गाणे हिट
या गाण्याची खासियत म्हणजे प्रदर्शित होण्याच्या एका वर्षानंतरही ‘तोहार आदत हो रहल बा’ हे गाणे इंटरनेटवर जलवा दाखवत आहे. व्हेव म्युझिक या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित झालेल्या या गाण्याला आतापर्यंत १० लाखांहून अधिक व्ह्यूजही मिळाले आहेत. इतकेच नाही, तर निरहुआ आणि आम्रपालीच्या या गाण्याला १५ हजारांहून अधिक लाईक्सही मिळाले आहेत.
अधिक वाचा-
‘या’ कॉमेडीयनने बिल्डरला लावला २० लाखांचा चुना, पोलिसांनी पाठवली नोटीस
शॉकिंग! अवघ्या तिशीत ‘या’ अभिनेत्याला झाली देवाज्ञा, कॅन्सरने घेतला बळी
सोळाव्या वर्षी ‘त्या’ एका गाण्याने खळबळ माजवणारी ‘शर्ली’ आज झालीये सत्तावीस वर्षांची