Wednesday, February 4, 2026
Home टेलिव्हिजन धक्कादायक! रुबीना दिलैकची प्रकृती गंभीर, सुजलेले डोळे अन् ओठ आणि….

धक्कादायक! रुबीना दिलैकची प्रकृती गंभीर, सुजलेले डोळे अन् ओठ आणि….

टीव्हीवरील आघाडीची अभिनेत्री आणि बिग बॉस 14 ची विजेता रुबीना दिलैक सतत वेगवेगळ्या कारणासाठी प्रेक्षकांचे लक्ष वेधत असते. ‘छोटी बहू‘ या मालिकेतून राधिका नावाच्या भूमिकेतू अभिनेत्री घराघरात पोहोचली असून तिच्या सुंदरतेने प्रेक्षकांना भुरळ घालती. आपल्या अभिनयीसोबतच रुबीना सोशल मीडिवारही खूप सक्रिय असते. अशातच रुबीनाने काही फोटो शेअर केले आहेत ज्याच्यामुळे चाहते चिंतेमध्ये पडले आहेत.

टीव्ही क्षेत्रामधील आघाडीची अभिनेत्री म्हणून रुबीना दिलैकला (Rubina Dilaik) ओळकलं जातं. रूबीना आपल्या अभिनयाबोतच सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असून वेगवेगळ्या स्टाइलचे फोटो शेअर करत असते. मात्र, नुकतंच अभिनेत्रीने असे काही फोटो शेअर केला आहे ज्यामुळे अनेक चाहत्यांना तिची काळजी लागली आहे.

रुबीनाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “ताप, घशाचं इन्फेक्शन यामुळे माझे ओठ आणि चेहकरा सूजला आहे. मी सध्या एखाद्या बदकाप्रमाणे दिसत आहे. मी याला त्रासले आहे आणि खूप वैतागलेही आहे. माझा स्वतःचा चेहरा पाहून मलाच हसू येत आहे.” अभिनेत्रीच्या फोटोंवर काहींनी काळजी व्यक्त केली आहे तर काहींनी तिची मज्जा घेत गमतीशीर कमेंट केल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

फोटोंमध्ये रुबीनाची तब्येत एवढी खराब झाली आहे ज्यामुळे तिचे ओठ आणि चेहरा सुजला आहे. कोणत्याच प्रकारची फिलर सर्जरी न करता तिचे ओठ बदकासारखे दिसत आहेत. तिची परिस्थिती खराब असूनही काही नेटकऱ्यांनी तिच्या तब्येची खिल्ली उडवत तिला राखी सावंत (Rakhi Sawant)ची उपमा दिली आहे.

रुबीनाच्या फोटोवर कमेंट करत एका चाहत्याने लहिले की, “असं काय खाल्लं की तुझ्या चेहऱ्याची अशी अवस्था झाली?” तर दुसऱ्यान लिहिले की, “मॅडम गांजा जास्त झालाय वाटतंय.” तर अजून एकाने लिहिले की, “असं वाटतंय मॅडमनी खराब झालेला मेकअप वापरला आहे.” तर एका अन्यने लिहिले की, “तू तर आता राखी सावंतसारखी दिसत आहेस.” अशा गंमतीशीर कमेंटने रुबीनाची खिल्ली उडवली जात आहे. तर काहींनी अभिनेत्रीबद्दल काळजी व्यक्त केली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
ओ मेरी हंसीनी…! हुमा कुरेशीच्या साडीवर कातीलाना अंदाज, पाहाच व्हायरल फोटो
मालदीवच्या समुद्रावर हिनाचा वेसस्टर्न लूक चाहत्यांना करतोय घायाळ

हे देखील वाचा