Thursday, September 28, 2023

‘किन्नर बहू’ बनत रुबीनाने मिळवले चाहत्यांच्या मनात स्थान; जाणून घ्या तिचा यशस्वी प्रवास

आपण पाहिले तर बऱ्याचदा टेलिव्हिजनला चित्रपटांपेक्षा कमी लेखले जाते. अनेकदा आधी टीव्हीवर आणि आता चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या काही कलाकारांनी हा आरोप देखील केला आहे की, टीव्हीच्या कलाकारांना बॉलिवूडमध्ये दुय्यम दर्जाची वागणूक मिळते. मात्र महामारीच्या या काळात आपण पाहिले तर आपल्या मनोरंजनासाठी फक्त टीव्हीची सोबत होती. आज जर आपण पाहिले तर या टेलिव्हिजन जगातील सर्व कलाकार बॉलीवूडच्या कलाकारांना लोकप्रियता, प्रसिद्धी,पैसा आदी प्रत्येक गोष्टीत तोडीसतोड टक्कर देतात.

टीव्ही इंडस्ट्रीमधील कलाकारांची लोकप्रियता देखील तुफान आहे. खासकरून अभिनेत्रीची लोकप्रियता अमाप आहे. टीव्ही इंडस्ट्रीमधील छोटी बहू म्हणून ओळख मिळालेली रुबीना दिलैक देखील लोकप्रियतेच्या बाबतीत बॉलिवूडमधील अभिनेत्रींना जोरदार टक्कर देते. रुबीनाने तिच्या जिवंत अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. अनेक हिट मालिका देणाऱ्या रुबीनाचा आज 33 वा वाढदिवस त्याच निमित्ताने जाणून घेऊया तिच्याबद्दल अधिक माहिती.(rubina dilaik birthday)

रुबीनाचा जन्म 26 ऑगस्ट 1987साली हिमाचल प्रदेशमध्ये झाला. 2006 साली तिने मिस शिमला स्पर्धेत भाग घेतला आणि ती स्पर्धा जिंकली देखील. तिला सुरुवातीपासूनच अभिनयामध्ये खूप रुची होती. त्यासाठी तिने मुंबई गाठली आणि अभिनयात काम मिळावे यासाठी प्रयत्न सुरु केले. अखेर तिच्या प्रयत्नांना यश आले आणि तिला ‘छोटी बहू’ ही मालिका मिळाली. रुबीनाने तिला मिळालेल्या या पहिल्या संधीचे सोने केले आणि प्रचंड लोकप्रियता मिळवली. मालिकेसोबतच रुबीना देखील हिट झाली. या मालिकेनंतर ती ‘सास बिना ससुराल’, ‘पुनर्विवाह’, ‘देवों के देव महादेव’, ‘तू आशिकी’ आदी काही मालिकांमध्ये दिसली.

रुबीनाने ‘शक्ती-अस्तित्व के एहसास की’ या मालिकेत किन्नर सुनेची भूमिका साकारली. या मालिकेतून तिने ती किती सशक्त अभिनेत्री आहे हे तिने सर्वांनाच दाखवून दिले. प्रत्येक कलाकाराच्या वाट्याला अशा भूमिका फार क्वचितच येतात, ज्या साकारून तुम्ही स्वतःला अजमावू शकतात. असेच रुबीनाच्या बाबतीत हे काम या मालिकेने केले. मालिका तुफान गाजली. आज जरी रुबीना या मालिकेचा भाग नसली तरी या मालिकेचे नाव घेतले की आधी तिचाच चेहरा डोळ्यासमोर येतो. इतकी ती या मालिकेशी आणि या भूमिकेशी एकरूप झाली होती.

मालिका चालू असतानाच रुबीनाला विवादित शो म्हणून ओळख असलेल्या बिग बॉसच्या 14व्या पर्वाची विचारणा झाली. रुबीनाने देखील या शोमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. या शोमध्ये ती अनेक मोठ्या आणि प्रसिद्ध कलाकारांसोबत दिसली. या शोमध्ये तिने योग्य पद्धतीचा खेळ खेळत शो जिंकला. या शोमध्ये ती तिच्या नवऱ्यासोबत अभिनव शुक्लासोबत दिसली होती. बिग बॉस जिंकल्यानंतर तिच्या लोकप्रियतेत खूप वाढ झाली.

रुबीना तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील अनेकदा चर्चेत आली आहे. छोटी बहू मालिकेदरम्यान रुबीना आणि तिचा सहकलाकार असणाऱ्या अविनाश सचदेव यांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. मात्र काही काळाने अविनाशने तिच्यासोबत नात्यात असून देखील अजून एका अभिनेत्रीला डेट करत असल्याने रुबीना आणि त्याचे नाते तुटले. त्यानंतर रुबीना आणि अभिनव यांची भेट झाली आणि काही काळाने हे दोघं नात्यात आले आणि पुढे त्यांनी 2018 साली लग्न केले. या दोघांमध्ये देखील खूप अंतर निर्माण झाले, मात्र बिग बॉस शोमुळे हे पुन्हा जवळ आले.

रुबीनाने भलेही मालिकांमध्ये सध्या आणि आदर्श सुनेच्या भूमिका साकारल्या असल्या तरी खऱ्या आयुष्यात ती अतिशय ग्लॅमरस आणि बोल्ड आहे. ती नेहमी सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो पोस्ट करत असते. तिचे सोशल मीडिया अकाउंट पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, ती बोल्ड आहे. सोशल मीडियावरील सक्रिय अभिनेत्रींच्या यादीत रुबीनाचा वरचा नंबर लागतो.

रुबीनाने कमाईच्या बाबतीत देखील पुढे आहे. तिने बिग बॉससाठी प्रत्येक आठवड्याला 5 लाख रुपये घेतले. त्यानंतर तिला हा शो जिंकल्यावर 38 लाख रुपये देण्यात आले. ती एका जाहिरातीसाठी जवळपास 35/40 लाख रुपये चार्ज करते. एका रिपोर्टनुसार तिच्याकडे 1/18 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

हेही नक्की वाचा-
कोट्यवधी संपत्तीची मालकीण आहे नीरू बाजवा; एका चित्रपटासाठी घेते ‘इतके’ लाख रुपये
पॅपराझींची हाक ऐकताच अनन्या पांडे लाजून झाली लाल, व्हिडिओ एकदा पाहाच

हे देखील वाचा