Monday, June 23, 2025
Home अन्य रुबीना दिलैकही झाली ‘बचपन का प्यार’ ट्रेंडमध्ये सामील; गोड चिमुकलीसोबतचा व्हिडिओ व्हायरल

रुबीना दिलैकही झाली ‘बचपन का प्यार’ ट्रेंडमध्ये सामील; गोड चिमुकलीसोबतचा व्हिडिओ व्हायरल

 

मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘जाने मेरी जानेमन’ हे गाणे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून, अनेकांना या गाण्याचे वेड लागले आहे. काहींनी तर या गाण्यावर अनेक रिल्स बनवली आणि इंस्टाग्रामवर शेअर केली. सामान्य लोकांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वच या गाण्यावर त्यांचे भन्नाट रिल्स शेअर करत आहेत. आता टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलैकने देखील या गाण्यावर एक व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओमध्ये रुबीना एका लहान मुलासोबत हे गाणे गाताना दिसत आहे. रुबीना सोशल मीडियावर नेहमी सक्रिय राहते. त्याचबरोबर तिला सोशल मीडियावर नवनवीन ट्रेंड फॉलो करण्याची आवड आहे.

रुबीना दिलैकचे सोशल मीडियावर खूप मोठे फॅन फॉलोइंग आहे. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करते. रुबिनाने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात ती ‘बचपन का प्यार’ या ट्रेंडिंग गाण्याचा आनंद घेत आहे. या व्हिडिओमध्ये ती एका लहान बाळासोबत गादीवर झोपून हे गाणे गाताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये रुबीनाने पिवळ्या रंगाचा टी-शर्ट घातला आहे. हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शन लिहिले, ‘ती क्यूटनेसने भरलेली इव्हाना तुमच्यासाठी.’ (Rubina new reels on tranding song ‘Jane Meri Jaaneman’)

रुबीना शेवटची ‘शक्ती-अस्तित्व के एहसास की’ या मालिकेमध्ये दिसली होती. त्याचबरोबर रूबीना ‘बिग बॉस १४’ ची विजेती सुद्धा आहे. तर मागील काही महिन्यांपासून ती म्युझिक व्हिडीओमध्ये व्यस्त आहे. तिने तिचा पती अभिनव शुक्लासोबत ‘तुमसे प्यार है’ या नावाने एक रोमँटिक म्युझिक व्हिडिओ केला आहे.

खरे तर रुबीनाला आयएएस व्हायचे होते. पण तिने अभिनयाची वाट धरत ‘छोटी बहू’ या मालिकेतून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्याचबरोबर २०१२ मध्ये तिने सोनी टीव्हीच्या ‘सास बिना ससुराल’ मध्ये सिमरन ‘स्माइली’ गिलची भूमिका केली.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी स्वत:ला स्टारकिड मानत नाही’; अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचे मोठे वक्तव्य

-‘इंडियन आयडल १२’च्या ग्रँड फिनालेने टेलिव्हिजन विश्वात नोंदवला ‘हा’ खास विक्रम; टीमने आनंद साजरा केला

-‘बिग बीं’च्या सुरक्षेत तैनात हेड कॉन्स्टेबलची झाली बदली; पगाराची माहिती मिळताच बॉडीगार्डविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश

हे देखील वाचा