हिंदी आणि मराठी मनोरंजनविश्वातील प्रसिद्ध जोडी अंकित मोहन आणि रुची सवर्ण हे काही दिवसांपूर्वीच एका चिमुकल्याचे आईबाबा झाले. रुचीने ८ डिसेंबर २०२१ रोजी एका मुलाला जन्म दिला. रुची आणि अंकितने आता दोन महिन्यांनी त्यांच्या मुलाचा चेहरा जगासमोर आणला आहे. आणीत आणि रुचीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांच्या मुलाचे रूयानचे काही सुंदर आणि आकर्षक फोटो शेअर केले असून, यासोबतच कॅप्शनमध्ये लिहिले की, “२ महिन्याच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रूयान.’
अंकितने शेअर केलेल्या फोटोमध्ये रुची, अंकित आणि रूयान दिसत आहे. या तिघांचे दोन फोटो त्याने शेअर केले असून, या फोटोमध्ये हे तिघं एक पूर्ण कुटुंब दिसत असून, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद देखील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यांच्या या पोस्टवर कलाकारांसोबतच फॅन्सदेखील कमेंट्सचा वर्षाव करून त्यांना शुभेच्छा देत रूयानचे कौतुक करताना दिसत आहे. अंकितची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, क्युट रूयान सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. लग्नाच्या सहा वर्षानंतर अंकित आणि रुचीने त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत केले आहे. अंकित आणि रुची २०१५ मध्ये लग्नबंधनात अडकले होते.
अभिनेता अंकित मोहन आणि त्याची पत्नी अभिनेत्री रुची सवर्ण यांनी आजवर अनेक हिंदी आणि मराठी मालिकांसोबतच चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी रुची आणि अंकितने ते आईबाबा होणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदचा वर्षाव झाला. रुचीने केलेले ‘मॅटर्निटी फोटोशूट’ इंटरनेटवर तुफान गाजले होते. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सख्या रे’ या मालिकेतून रुचीला चांगलीच लोकप्रियता मिळाली. अंकितने अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केले असून, त्याची ‘नागिन 3’, ‘महाभारत’मधील भूमिका चांगलीच गाजली होती. ‘फत्तेशिकस्त’ या सिनेमातही हे दोघे महत्वाच्या भूमिकेत झळकले होते. या सिनेमात अंकितने यसाजीची भूमिका तर रुचिने सोयराबाईंच्या भूमिका साकारली होती. लवकरच अंकित ‘पावनखिंड’ सिनेमात झळकणार आहे.
हेही वाचा-