Wednesday, July 3, 2024

जान्हवी कपूरच्या वाढदिवसानिमित्त शिखर पहाडियाने शेअर केला राेमॅंटिक फाेटाे, एकदा पाहाच

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आज म्हणजेच साेमवारी (दि. 6मार्च)ला तिचा 26 वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने अभिनेत्रीवर अनेक शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. एकीकडे, अभिनेत्रीला भाऊ अर्जुन कपूर, बहीण खुशी कपूर आणि बेस्ट फ्रेंड अनन्या पांडेने तिच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या, तर दुसरीकडे,अभिनेत्रीचा अफवा असलेला बॉयफ्रेंड शिखर पहाडियानेही तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

शिखर (shikhar pahadia) याने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर जान्हवीसोबतचा एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये हे जाेडप रात्रीच्या अंधारात चंद्राकडे टक लावून पाहत आहे. जान्हवीसोबतचा हा फोटो शेअर करत शिखरने लिहिले की, “वाढदिवसाच्या शुभेच्छा.” यासोबतच त्याने हार्ट इमोजीही टाकला आहे. याशिवाय शिखरने जान्हवीचा आगामी चित्रपट NTR 30 ची पोस्ट देखील शेअर केली आहे.

janhvi kapoor with shikhar pahadia

जान्हवी कपूर अलीकडेच वडील बोनी कपूर आणि बहीण खुशी कपूरसोबत मुंबई विमानतळावर दिसली. इतकंच नाही, तर यावेळी शिखर पहाडियाही स्पाॅट झाला. माध्यमातील वृत्तांनुसार, ते सर्व एकत्र सुट्टीवर आहेत आणि जान्हवीचा वाढदिवस साजरा करत आहेत. मात्र, मंडळी आम्ही तुम्हाला सांगाते, जान्हवी कपूर हिने शिखर पहाडिया याच्या साेबतच्या नात्यावर अद्याप काेणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

शिखर व्यतिरिक्त त्याचा भाऊ वीर पहाडियानेही जान्हवी कपूरचे अभिनंदन केले आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले, “जान्हवी कपूरला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तु खूप आनंदी आणि साहसी राहा. तुझ्या मेहनतीने आणि समर्पणाने सर्वांना प्रेरणा देत राहा. आकाशाची मर्यादा आहे. देवाची तुझ्यावर कृपा राहाे .”

janhvi kapoor
Photo Courtesy: Instagram

जान्हवी कपूरने बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी शिखर पहाडियाला डेट केले होते. मात्र, मध्यंतरी त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्याही समोर आल्या. अशात गेल्या काही महिन्यांपासून हे दोघेही एकत्र स्पॉट होत आहेत.(rumored boyfriend shikhar pahadia shared a romantic picture on bollywood actress janhvi kapoor birthday)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अमृता फडणवीस पुन्हा ट्रोल, नेटकरी म्हणाले…’मामी उर्फी जावेदचं मार्केट जाम करणार’

अखेर अप्रत्यक्षरीत्या का होईना शैलेश लोढा यांनी सांगितले ‘तारक मेहता…’ सोडण्याचे खरे कारण

हे देखील वाचा