Thursday, June 13, 2024

तो किस्सा, जेव्हा ‘या’ कारणामुळे जान्हवी कपूरला चक्क गाडीच्या डिक्कीमध्ये लागले लपावे

अभिनेत्री जान्हवी कपूर हिचा आज म्हणजेच साेमवारी (दि. 6 मार्च)राेजी जान्हवीचा 25वा वाढदिवस आहे. अशात एका मुलाखतीदरम्यान जान्हवीने पॅपराजींना टाळण्यासाठी काय करायचे ते सांगितले. काय म्हणाली अभिनेत्री? चला जाणून घेऊया…

जान्हवी कपूरने तिचे मित्र आणि ट्रेनर नम्रता पुरोहितला काही मनोरंजक किस्से सांगितले. अगोदर नम्रताने सांगितले होते की, “एकदा जान्हवी कपूर जिमच्या बाहेरून जात होती आणि तिला पॅपराजीच्या कॅमेरामध्ये कैद व्हायचे नव्हते. अशा परिस्थितीत ती गाडीच्या डिक्कीमध्ये लपली.” यावर जान्हवी म्हणाली की, “खरं तर तिला त्या दिवशी जिममध्ये यायचे नव्हते. तिला घरी थकवा जाणवत होता. पॅपराजीने तिचे फोटो काढावे अशी तिची अजिबात इच्छा नव्हती.” Janhvi Kapoor had to hide in the trunk of the car for this reason)

जान्हवी कपूर पुढे म्हणाली की, “पॅपराजीला त्या दिवशी वाईट वाटले असेल. ते आमच्यासाठी खूप काम करतात. ते सर्व दुचाकीवरून आमच्या मागे येत होते. त्यानंतर आम्हाला एका खराब ठिकाणी थांबावे लागले आणि तुम्हाला माहीत आहे का, मला किती वेळा माझ्या कारच्या डिक्कीमध्ये लपावे लागले? खूप वेळा. माझ्या गाडीत नेहमी एक ब्लँकेट असतं. मी हे ब्लँकेट तेव्हा वापरते, जेव्हा मला एखाद्या ठिकाणी जायचं नसता पण मला जावं लागतं.”

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पहाटे 2 वाजता प्राइवेट प्रॉपटीमध्ये पॅपराझींच्या एंट्रीवर सैफ अली खान म्हणाला, ‘कुठे आहे मर्यादा?…’

आमिर खानच्या बोलण्यावर संतापले होते मोगॅंबो, नेमके काय होते कारण? एकदा जाणून घ्याच

हे देखील वाचा