बॉलिवूडची बार्बी डॉल म्हणून प्रसिद्ध असलेली अभिनेत्री कॅटरिना कैफ नेहमीच या ना त्या कारणामुळे सोशल मीडियावर चर्चेचा विषय असते. मात्र मागील बऱ्याच दिवसांपासून कॅटरिना तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या अफेयरच्या चर्चांमुळेच लाइमलाईट्मधे आली आहे. कॅटरिना कैफ आणि विकी कौशल हे एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या मीडियामध्ये जोरशोरावर असल्याचे सर्वांनाच माहित आहे.
मात्र आता या सर्वांमध्ये कॅटरिना आणि विकीने साखरपुडा केल्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे. या दोघांनी साखरपुडा केल्याच्या बातम्या सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरत असून, याबद्दल आता लोकांच्या चर्चांना उधाण आले आहे. या साखरपुड्याबद्दल अजून कॅटरिना किंवा विकी दोघांकडूनही अधिकृत माहिती आली नसली तरी या बातम्या मीडियामध्ये गाजताना दिसत आहे. या दोघांच्या नात्याबद्दल देखील त्यांनी कधीच स्वतःहून माहिती दिली नाही.
सोशल मीडियावर तर या दोघांच्या फॅन्सने त्यांना अभिनंदन करायला सुरुवात केली असून, सलमानला सोडून कॅटरिनाने विकिसोबत साखरपुडा केला याबद्दल देखील आता मोठ्या चर्चा होऊन तशा कमेंट्स देखील व्हायरल होत आहेत.
काही दिवसांपूर्वी कॅटरिना आणि विकी यांच्या रिलेशनच्या बातम्या आल्या होत्या. यादरम्यान एका मुलाखतीमध्ये, अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूरने कॅटरिना आणि विकी एकमेकांना डेट करत असल्याचे जाहीर केले होते. या खुलाशानंतर कॅटरिना किंवा विकी यांच्याकडून कोणतीही माहिती समोर आली नव्हती. या दोघांनी नेहमीच त्यांचे नाते मीडियापासून लपवले. मात्र, मीडियाने देखील या दोघांना त्यांच्या कॅमेऱ्यांमध्ये अनेकदा कैद केले होते.
कॅटरिनाने नुकताच तिचा एक मिरर सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केला होता, या फोटोमध्ये विकी कौशलची झलक देखील पाहायला मिळत होती. या फोटोवरून चर्चा रंगताना दिसल्यावर कॅटरिनाने तिचा हा फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवरून डिलीट केला. आता या साखरपुड्याच्या केवळ अफवा आहे की, त्यांनी खरंच साखरपुडा केला आहे, हे तर येणार काळच सांगेल.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–खरंच की काय! जेह देखील आहे ‘लाल सिंग चड्ढा’च्या रोमँटिक गाण्याचा भाग? करीनाने केला खुलासा










