वयाच्या चौदाव्या वर्षीच नीतू सिंग करायची ऋषी कपूरबरोबर डेट, लग्नात दोघेही झाले होते बेशुद्ध


ऋषी कपूर आणि नीतू यांच्या लग्नाला 41 वर्ष पूर्ण झाली आहेत. ऋषी कपूर यांचं मागच्या वर्षी कर्करोगाने निधन झाले होते. त्यामुळे नीतू यांना त्यांच्या आठवणींच्या उजाळा देत लग्नाचा वाढदिवस साजरा करावा लागला. खूप कमी लोकांना हे माहित आहे की, आपल्या लग्नाच्या दरम्यान ऋषी कपूर आणि नीतू सिंह दोघेही बेशुद्ध पडले होते. त्यांची कारणं मात्र वेगवेगळी होती. नीतू यांचा लेहंगा इतका जड होता की, तो त्या सांभाळू शकल्या नाहीत आणि बेशुद्ध पडल्या. तर ऋषी कपूर हे आजूबाजूच्या गर्दीने त्रस्त होऊन खाली पडले होते.

14 वर्षांच्या वयातच ऋषी यांना डेट करू लागली होती नीतू
नीतू यांनी एका मुलाखतीत त्यांच्या अफेअरबद्दल सांगितले होते. सिनेमाच्या सेटवर ऋषी कपूर नीतू यांना सतत छेडत असायचे. त्यांची ही सवय नीतूला त्रासदायक वाटत असे. मात्र हळूहळू हाच राग प्रेमात रुपांतरीत झाला. या जोडीचा पहिला सिनेमा ‘जहरीला इन्सान’ होता, परंतु ‘खेल खेल में’ सिनेमानंतर ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या रोमान्सची चर्चा रंगली. अफेअरच्या काहीच वर्षानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

नीतूला हवा होता ‘बॉबी’ मधे रोल
नीतूची खूप इच्छा होती की, तिला आरे. के. बॅनर यांच्या ‘बॉबी’ सिनेमात मुख्य रोल करावा. परंतु यामध्ये डिंपल कापडियाने ती भूमिका साकारली. याच कारण म्हणजे, राज कपूर ‘बॉबी’ साठी एका नवीन चेहर्‍याचा शोधात होते आणि त्यावेळी नीतू काही चित्रपटांमध्ये दिसली होती. त्यानंतर ऋषी आणि नीतू यांनी सलग अनेक चित्रपट केले. ‘रफू चक्कर’, ‘दूसरा आदमी’, ‘कभी-कभी’, ‘अमर अकबर अँथनी’ अशा अनेक चित्रपटांमध्ये प्रेक्षकांनी या जोडीला पसंती दिली होती.

जेव्हा राज कपूर बोलले- प्रेम आहे तर लग्न करा
त्या काळी ही गोष्ट इंडस्ट्रीमध्ये अगदी हवेसारखी पसरत होती की, ऋषी आणि नीतू यांना एकमेकांसोबत लग्न करायचं आहे. नीतूचं कपूर खानदानाच्या घरात येणं-जाणं चालू झालं होतं. नीतू ऋषींशी तिच्या लग्नाबद्दल गंभीर होती ही गोष्ट ऋषी यांच्यासह तिच्या संपूर्ण कुटुंबालाही माहित होती. एक दिवस राज कपूरने ऋषीला स्पष्टपणे सांगितले की, त्यांचे नीतूवर प्रेम असेल तर त्यांनी तिच्याशीच लग्न करायला हवे.


Leave A Reply

Your email address will not be published.