Sunday, December 29, 2024
Home अन्य RussiaVsUkraine | रशियन गोळीबारात प्रसिद्ध बॅलेट डान्सर ठार, तीन आठवड्यांपासून होता जखमी

RussiaVsUkraine | रशियन गोळीबारात प्रसिद्ध बॅलेट डान्सर ठार, तीन आठवड्यांपासून होता जखमी

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध तीव्र होत आहे. या युद्धाचा फटका निष्पाप लोकांना पडत आहे. दोन्ही देशांमध्ये सुरू झालेल्या या युद्धाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेले युद्ध थांबण्याचे नाव घेत नाही आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रशिया युक्रेनच्या विविध भागात बॉम्बफेक करत आहे. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचवेळी, आता युक्रेनचा बॅलेट डान्सर आर्टिओम डॅटशीनचा (Artyom Datsishin) मृत्यू झाला आहे. आर्टिओम डॅटशिनचे गुरुवारी (१७ मार्च) निधन झाले. तो ४३ वर्षांचा होता. यापूर्वी तो रशियन गोळीबारात जखमी झाला होता आणि आता त्याने या जगाचा कायमचा निरोप घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे तीन आठवड्यांपूर्वी आर्टिओम डॅटशिन गोळी लागल्याने जखमी झाला होता. यादरम्यान त्याला गंभीर जखमा झाल्या. त्याचवेळी, आर्टिओम डॅटशिन याच्यावर शुक्रवारी (१८ मार्च) कीवमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आर्टिओम डॅटशीन हा युक्रेनच्या नॅशनल ऑपेराचे प्रमुख डान्सर होता.

युक्रेनियन अभिनेत्री ओक्साना श्वेट्सचा काही दिवसांपूर्वी कीवमध्ये रशियन हल्ल्यादरम्यान आर्टिओम डॅटशिनचा मृत्यू झाला. खर तर, ६७ वर्षीय अभिनेत्रीच्या मृत्यूची पुष्टी होऊ शकली नाही. यानंतर, तरुण थिएटर समुदायाने सोशल मीडियाद्वारे अभिनेत्रीच्या मृत्यूची पुष्टी केली. ओक्सानाने यंग थिएटर कम्युनिटीमध्ये बराच काळ काम केले, ती देखील त्याची सदस्य होती.

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध २४ फेब्रुवारी २०२२ रोजी सुरू झाले. रशियाने युक्रेनवर मोठ्या प्रमाणावर हल्ले करण्यास सुरुवात केली आणि आतापर्यंत दोघांमध्ये युद्ध सुरू आहे. दोन्ही देशांमधील या युद्धाला जवळपास २२ दिवस झाले असून, त्यात मोठ्या प्रमाणात लोक मारले जात आहेत. युनायटेड नेशन्स ह्युमन राइट्स कौन्सिलच्या कार्यालयानुसार, युक्रेनमध्ये संघर्ष सुरू झाल्यापासून सुमारे ६०० नागरिक मारले गेले आहेत आणि एक हजाराहून अधिक जखमी झाले आहेत. त्याचवेळी, संयुक्त राष्ट्रांच्या मते युक्रेनमध्ये सुमारे ६.५ लाख लोक विस्थापित झाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा –

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा