Saturday, July 27, 2024

धक्कादायक! पंतप्रधानांवर टीका करणाऱ्या गायकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ, चौकशी सुरु

रशियन संगीतकार डिमा नोवाचा एका अपघातात मृत्यू झाला आहे. पॉप सिंगर नोवाचा १९ मार्च रोजी एक नदी पार करत असताना बर्फ पडून मृत्यू झाला आहे. रिपोर्टनुसार तो त्याचा भाऊ आणि तीन मित्रांसोबत बर्फ झालेली वोल्गा नदी पार करत होता. या दरम्यान तो बर्फात पडला. त्याच्या दोन मित्रांना बर्फाखालून काढण्यात आले तर एकाच मृत्यू झाला.

मीडियामधील माहितीनुसार ३५ वर्षीय नोवाने त्याच्या एका गाण्यांमधून रशियाचे राष्ट्रपती असणाऱ्या व्लादिमीर पुतिन यांची निंदा केली होती. त्याने त्याच्या गाण्यांमधून पुतीन यांची निंदा केल्यानंतर तो प्रकाशझोतात आला. रशियामध्ये युद्धाच्या विरोधात झालेल्या निदर्शनामध्ये देखील लोकांनी त्याच्या गाण्याचा वापर केला होता.

लोकप्रिय रुसी बँड असलेल्या ‘क्रीम सोडा’चा संस्थापक असलेल्या नोवाचे खरे नाव दिमित्री स्विरगुनोव होते. ‘एक्वा डिस्को’ सॉन्ग त्याचे सर्वात लोकप्रिय गाणे समजले जाते. हेच गाणे नंतर युक्रेनवर हल्ला झाल्यानंतर रशियन निदर्शनकरणाऱ्या लोकांचे गाणे झाले होते. नोवाने त्याच्या गाण्यातून पुतीन यांच्या आलिशान बंगल्याची देखील निंदा केली होती.

म्युझिक बँड क्रीम सोडाने इनस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत त्यांच्या संस्थापकाचा मृत्यू झाल्याची बातमी दिली. १९ मार्च रोजी आमच्यावर एक मोठे दुःख येऊन कोसळले. डिम नोवा मित्रांसोबत वोल्गा नदीवर चालत असताना अचानक बर्फाखाली गेले.” सोबतच त्यांनी नोवा आणि त्याच्या मित्रांचा फोटो शेअर करत लिहिले, “डिम नोवा आणि त्याचा मित्र गोशी आता या जगात नाही.” २०१२ साली डिम नोवाने इलिया गदायेव सोबत मिळून क्रीम सोडा बँड सुरु केला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
माधुरीने आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला वाढदिवस; म्हणाली, “निस्वार्थी निखळ मुलांमध्ये…”

‘मैत्रीत जाणीव पाहिजे आणि…’ सुनील शेट्टीने सलमान आणि त्याच्या नात्यावर भाष्य

हे देखील वाचा