Saturday, February 22, 2025
Home बॉलीवूड एकेकाळी ‘या’ अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं ‘हँडसम हंक’ ऋतिक रोशनचं नाव; चौघींनी दुसऱ्यासोबत संसारही थाटला

एकेकाळी ‘या’ अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं ‘हँडसम हंक’ ऋतिक रोशनचं नाव; चौघींनी दुसऱ्यासोबत संसारही थाटला

हिंदी सिनेसृष्टीतील हॅन्डसम बॉय अशी ओळख आलेल्या अभिनेत्यांमध्ये ह्रतिक रोशनचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. ह्रतिक रोशन त्याच्या देखण्या आणि रुबाबदार लूकमुळे नेहमीच चर्चेत असतो. यामुळेच त्याचा चाहता वर्गही खूप मोठा आहे. तरुणाईला त्याच्या पिळदार शरीरयष्टीने कायमच आकर्षित केले आहे. त्यामुळेच त्याचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले.

लोकप्रिय अभिनेता ह्रतिक रोशनचे नाव सध्या गायिका आणि अभिनेत्री सबा आजाद सोबत जोडले जात आहे. दोघांच्या प्रेम प्रकरणाची सगळीकडे जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. दोघांनाही अलिकडेच एका रेस्टोरंटच्या बाहेर स्पॉट करण्यात आले होते. ह्रतिकने सबाचा हात घट्ट पकडल्याचे यामध्ये दिसून आले. माध्यमांच्या गराड्यातुन मार्ग काढताना ह्रतिकने तिचा हात घट्ट पकडला होता. त्यांचे हे व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले. यामुळे त्यांच्या प्रेमप्रकरणाचीही चर्चा सध्या सुरु आहे. मात्र अभिनेता ह्रतिक रोशन आणि प्रेमप्रकरण हे समीकरण काही नवीन नाही, या आधीही अनेक अभिनेत्रींसोबत त्याचे नाव जोडले गेले आहे. कोण आहेत या अभिनेत्री चला जाणून घेऊ या.

एंजेलो क्रिलिंज्की-

अभिनेता ह्रतिक रोशन आणि पॉलिश अभिनेत्री एंजेलोच्या प्रेमप्रकरणाची दिर्घकाळ चर्चा रंगली होती. या चर्चेच मुळ कारण म्हणजे अभिनेत्री एंजेलोने आपल्या ट्विटर अकाउंटवरुन मी ह्रतिकला आपला मित्र मानते अशी माहिती दिली होती. यावर ह्रतिक रोशनने तुम्ही कोण आहात मी ओळखत नसल्याची प्रतिक्रिया दिली होती .यामुळे त्यांच्यामध्ये काहीतरी सुरु असल्याच्या जोरदार चर्चा सुरु होत्या.

बारबरा मौरी –

‘काइट्स’ चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी ह्रतिक रोशनचे नाव हॉलिवूड अभिनेत्री बारबरा मौरीसोबतही जोडले गेले होते. या चर्चांमुळे ह्रतिकच्या वैवाहिक आयुष्यावरही विपरीत परिणाम होवु लागला त्यामुळे त्यांनी लांब राहण्याचा निर्णय घेतला.

कंगणा रनौत-

ह्रतिक रोशन आणि कंगणा रनौतच्या प्रेमप्रकरणाची संपुर्ण सिनेसृष्टीत चर्चा रंगली होती. या संपुर्ण प्रेमप्रकरणाचा खुलासा एका मुलाखतीत झाला होता. यावेळी ह्रतिकने कंगणाचा सिल्ली एक्स असा उल्लेख केला होता. दोघांचे ब्रेकअप झाल्यानंतर कंगणाने ह्रतिकवर चित्रपटातुन काढून टाकल्याचा ही आरोप केला होता, ज्यामुळे तिला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले होते.

करीना कपूर –

‘कभी खुशी कभी गम’ सारख्या चित्रपटात एकत्र काम केलेले कलाकार म्हणजे ह्रतिक रोशन आणि करीना कपूरही रिलेशनशीप मध्ये होते. त्यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सर्वत्र रंगली होती. मात्र या सगळ्यावर प्रतिक्रिया देताना करीनाने या सगळ्या अफवा असल्याचे सांगत मला विवाहीत पुरुषांमध्ये रस नसल्याचा खुलासा केला होता.

कॅटरिना कैफ –

‘बॅंगबॅग’ चित्रपटाच्यावेळी या कॅटरिना कैफ आणि ह्रतिक रोशन यांना एकत्र पाहण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या प्रेमप्रकरणाची चर्चा रंगली होती. मात्र याबाबत कधीही खरी माहिती समोर येऊ शकली नाही.

यामी गौतम –

‘काबील’ चित्रपटानंतर ह्रतिक रोशन आणि यामी गौतममध्ये जवळीक वाढल्याची चर्चा रंगली होती. दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा ही त्यावेळी सुरु होत्या.मात्र याबाबत कधीही अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

पूजा हेगडे –

‘मोहेंजदाडो’ चित्रपटावेळी पूजा हेगडेसोबतही ह्रतिकचे नाव जोडले गेले होते. मात्र पूजाने आम्ही चांगले मित्र आहोत म्हणत या चर्चांना पुर्णविराम दिला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा :
सलमान खाननंतर ऋतिक रोशनसोबत झळकणार शहनाज गिल, व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
अरेरे कसलं ते दुर्देव! अभिनेता ऋतिक रोशनने ज्या चित्रपटांची ऑफर धुडकावली तेच ठरलेत सुपरहीट

हे देखील वाचा