Thursday, April 18, 2024

अरेरे कसलं ते दुर्देव! अभिनेता ऋतिक रोशनने ज्या चित्रपटांची ऑफर धुडकावली तेच ठरलेत सुपरहीट

अभिनेता ह्रतिक रोशन (Hrithik Roshan) हा हिंदी सिने जगतातील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. आपल्या दमदार अभिनयाने आणि डॅशिंग लूकमुळे ऋतिक रोशनने सिने जगतात प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये ऋतिक रोशनने आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. परंतु ऋतिक रोशनच्या नावावर आणखी एका वाईट गोष्टीची नोंदही केलेली पाहायला मिळत आहे. अभिनेता ऋतिक रोशनने नाकारलेले अनेक चित्रपट सुपरहीट ठरल्याचेही बऱ्याचदा पाहायला मिळाले आहे. पाहूया कोणते आहेत ते चित्रपट. 

बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता हृतिक रोशनने आपल्या फिल्मी करिअरमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटातून त्यांनी चित्रपट प्रवासाला सुरुवात केली. कोई मिल गया या चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाची जबरदस्त छाप सोडली. जरी असे अनेक चित्रपट आहेत, ज्यांना हृतिकने नकार दिला होता, पण जेव्हा ते प्रदर्शित झाले तेव्हा ते सुपरहिट ठरले.

लगान- आशुतोष गोवारीकर यांनी लगान बनवण्याचा विचार केला तेव्हा भुवनच्या भूमिकेसाठी त्यांची पहिली पसंती हृतिक रोशन होती. 2001 साली आलेल्या या चित्रपटाने प्रचंड कमाई केली. हृतिकच्या नकारानंतर आशुतोषने आमिर खानला या चित्रपटात मुख्य भूमिकेत घेतले आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला.

बाहुबली- बाहुबली मालिकेने जगभरातील बॉक्स ऑफिसवर अनेक विक्रम मोडले. चित्रपटाचा नायक प्रभास सर्वत्र होता, परंतु ही गोष्ट तुम्हाला आश्चर्यचकित करेल की बाहुबलीच्या भूमिकेसाठी हृतिक रोशनला पहिली पसंती होती. त्याच्या नकारानंतर हा चित्रपट प्रभासच्या वाट्याला  गेला.

रंग दे बसंती- राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित रंग दे बसंती या चित्रपटातील करण मल्होत्राच्या व्यक्तिरेखेसाठी हृतिकला पहिली पसंती होती, पण त्याने हा चित्रपट करण्यासही नकार दिला. यानंतर सिद्धार्थने करण मल्होत्राची भूमिका साकारली. हा चित्रपट प्रचंड गाजला.

पिंक पँथर 2- हृतिक रोशनलाही हॉलिवूड चित्रपट पिंक पँथर 2 साठी भूमिकेची ऑफर देण्यात आली होती, परंतु त्याने हे पात्र आपल्यासाठी योग्य नसल्याचे सांगून नकार दिला.

याशिवाय हृतिकने स्वदेश, दिल चाहता है आणि बंटी और बबली या चित्रपटांनाही नकार दिला होता. ज्यानंतर इतर कलाकारांनी त्यांची सोडलेली भूमिका केली. सध्या हृतिक रोशन त्याच्या आगामी ‘विक्रम वेधा’ या चित्रपटात खूप व्यस्त आहे. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
हॅपी बर्थडे कल्की! अनुराग कश्यपसोबत ब्रेकअपनंतर बॉयफ्रेंडच्या मुलीला दिला जन्म, वाचा अभिनेत्रीबद्दल
‘मी जाड होते म्हणून मलायकाला छैय्या छैय्या…’, तब्बल 25 वर्षांनंतर शिल्पाने तोडले मौन

हे देखील वाचा