Saturday, July 6, 2024

आजी शर्मिला टागोरने केला जेहवर प्रेमाचा वर्षाव, लेटेस्ट फोटोत पाहायला मिळाला चिमुकल्याचा ‘कुल लूक’

अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांच्या मुलांची नेहमीच चर्चा पाहायला मिळत असते. त्यांचा छोटा मुलगा तैमुर तर सोशल मीडियावर चर्चेत असतोच. मात्र आता त्यांच्या छोट्या मुलाचीही चर्चा व्हायला लागली आहे. तैमुर प्रमाणेच तोही त्यांच्या कुटुंबात सगळ्यांचा लाडका आहे. घरात सगळ्यात छोटा असल्याने सगळेच त्याचा लाड करत आहेत. नुकताच सबा पतौडीने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक फोटो शेअर केला आहे, ज्याची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान यांची सोशल मीडियावर नेहमीच चर्चा होत असते. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या सबा पतौडीने पोस्ट केलेल्या एका फोटोची सगळीकडे चर्चा रंगली आहे. ज्यामध्ये करीना कपूरचा छोटा मुलगा जेह अली खान आणि आजी शर्मिला टागोर (Sharmila Tagore) बागेत खेळताना दिसत आहेत. आपल्या नातवासोबत क्षण घालवताना शर्मिला टागोर खूपच आनंदी दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद सगळ्यांनाच दिसत आहे. या सुंदर फोटोसोबत सबाने मोठी आई आणि जेह बाबा, अशी नाती खूपच सुंदर असतात असा कॅप्शन दिला आहे. सध्या हा फोटो सगळीकडे चर्चेत आहे.

दरम्यान सबा पतौडी नेहमीच आपल्या परिवाराचे सुंदर फोटो शेअर करत असते. तिचे चाहते हे फोटो पाहून नेहमीच आनंदी होत असतात. तिला नेहमीच आपल्या फॅमिलीचे फोटो शेअर करायला आवडते त्यामुळेच तिच्या सोशल मीडियावर जास्तीत जास्त तिच्या फॅमिलीचे फोटो पाहायला मिळत असतात. सध्या तिने पोस्ट केलेला हा फोटो सगळीकडेच व्हायरल होत आहे.

हेही वाचा-

हे देखील वाचा