×

बच्चनपांडे सिनेमातील ‘सारे बोलो बेवफा’ गाणे प्रदर्शित, तुटलेल्या हृदयांना जोडण्यासाठी अक्षयचे नवीन पाऊल

सध्या अक्षय कुमार त्याच्या आगामी ‘बच्चन पांडे’ सिनेमासाठी खूपच चर्चेत आला आहे. या सिनेमातील त्याचा लूक, त्याची भूमिका आणि एकूणच सिनेमाचा ट्रेलर पाहून चित्रपटाबद्दलची लोकांची उत्सुकता अधिकच वाढली आहे. या सिनेमाची टीम चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. नुकतेच या सिनेमातील नवीन गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. ‘सारे बोलो बेवफा’ हे या नवीन गाण्याचे बोल असून, हे गाणे एकटाच तुम्हाला नाचण्यासाठी प्रवृत्त करणारे आहे.

अक्षय कुमारने त्याच्या सिनेमातील हे नवीन गाणे ‘सारे बोलो बेवफा’ प्रदर्शित झाल्याची माहिती त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून दिली आहे. त्याने या गाण्याची क्लिप शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले, “आता हृदय तुटल्याचा त्रास सर्वत्र जोरात ऐकायला मिळेल कारण सगळेच जोरात म्हणणार बेवफा.” या गाण्यामध्ये अक्षय कुमारचा अतिशय भीतीदायक अवतार पाहायला मिळत आहे. अक्षयची ही पोस्ट लगेच व्हायरल झाली असून, काही तासातच ११ लाखांपेक्षा अधिक लाईक्स आले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

या गाण्याची सुरुवात अक्षय कुमारच्या दमदार संवादाने होते, ज्यात तो कृती सेननला म्हणताना दिसतो, “‘ओ डायरेक्टर तोहार स्क्रिप्ट में हमरा दहशत है, हमरा किलिंग है, लेकिन एक चीज मिसिंग है, एंटरटेनमेंट” यानंतर या ‘सारे बोलों बेवफा’ धमाकेदार गाण्याची सुरुवात होते, ज्यात अक्षय दमदार डान्स करताना दिसत आहे. याआधी या सिनेमातील ‘मार खाएगा’ आणि रोमॅंटिक गाणे ‘मेरी जान-मेरी जान’ प्रदर्शित झाले होते, ज्यांना प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. या गाण्याला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल यात शंका नाही. बच्चन पांडे सिनेमाबद्दल सांगायचे झाले तर या सिनेमात अक्षय कुमार आणि कृती सेननसोबत जॅकलिन फर्नांडिस, अर्शद वारसी, पंकज त्रिपाठी, प्रतीक बब्बर, संजय मिश्रा आदी कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा –

Latest Post