Wednesday, March 25, 2026
Home बॉलीवूड दुःखद! प्रसिद्ध संगीतकार मोहम्मद जहूर खय्याम यांच्या पत्नी जगजीत कौर यांचे निधन

दुःखद! प्रसिद्ध संगीतकार मोहम्मद जहूर खय्याम यांच्या पत्नी जगजीत कौर यांचे निधन

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार मोहम्मद जहूर खय्याम हाश्मी यांच्या पत्नी जगजीत कौर यांचे निधन झाले आहे. त्यांनी रविवारी (१५ ऑगस्ट) अखेरचा श्वास घेतला. त्या ९३ वर्षांच्या होत्या. विलेपार्ले रोडवरील पवन हंस स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ही माहिती केपीजी ट्रस्टच्या प्रवक्त्याने दिली. हे ट्रस्ट खय्याम आणि जगजीत कौर यांनी गरीब आणि गरजू लोकांसाठी उभारले होते. त्यांनी आपली सर्व संपत्ती या ट्रस्टच्या नावावर केली होती.

खय्यामच्या मृत्यूनंतर जगजीत कौर या त्यांच्या कुटुंबात एकट्या राहिल्या होत्या. त्यांना एक मुलगा देखील होता. परंतु तो मागील काही वर्षांपूर्वी मरण पावला होता. आता त्यांच्या कुटुंबात कोणीही उरले नाही, परंतु खय्याम यांची गाणी आणि संगीत यांनी ते नेहमीच लोकांच्या हृदयात घर करून राहतील. परंतु खय्याम आणि जगजीत कौर यांची जुगलबंदी अप्रतिम होती. (Sad news Jagjit Kaur wife of famous musician Mohammad Zahoor Khayyam has passed away)

जगजीत कौर आणि खय्याम यांचा प्रेमविवाह झाला होता. कदाचित खूप कमी लोकांना माहित असेल की, जगजीत कौर आणि खय्याम यांची भेट अशी होती की, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. वृत्तानुसार, जगजीत कौरने त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, त्या प्रथम दादर रेल्वे स्टेशनवर खय्याम साहेबांना भेटल्या होत्या. जगजीत कौर यांनी खय्याम साहेबांना एक स्टॉकर समजले होते आणि त्यांच्यापासून सुटका करण्यासाठी त्या वेगाने आपल्या दिशेने जात होत्या. जेव्हा दोघे आमनेसामने आले, तेव्हा खय्याम साहेबांनी त्यांना सांगितले की, ते एक संगीतकार आहेत आणि मग जगजीत कौर यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

यानंतर, दोघांची भेट पुढे वाढत गेली आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडू लागले होते. प्रेम असल्यामुळे त्यांना लग्न करायला वेळ लागला नाही. खय्याम यांच्यावर असलेल्या प्रेमाबद्दल सांगताना त्या म्हणाल्या होत्या की, “शाम-ए-गम की कसम हे गाणे ऐकल्यानंतर मी खय्याम साहेबांच्या प्रेमात कसे पडू शकत नाही.”

खय्याम साहेब जगजीत कौर यांना त्यांचे उमराव जीवन म्हणायचे. दोघांमध्ये इतके प्रेम होते की, आयुष्यात कितीही अडचणी आल्या, तरीही दोघांनी मिळून त्या अडचणींचा सामना केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Bigg Boss OTT: धमाकेदार वीकेंडमध्ये पाहुणे म्हणून येणार ‘सिडनाज’, पुन्हा एकदा पाहायला मिळणार त्यांची केमिस्ट्री

-अशी गाणी जी ऐकून तुमच्याही अंगावर येतील शहारे! ‘ए वतन’ ते ‘तेरी मिट्टी’सह ‘या’ गाण्यांसोबत साजरा करा स्वातंत्र्यदिन

-‘मानवतेचा उत्सव साजरा करूया’ म्हणत, प्रकाश राज यांनी ध्वजारोहण करत साजरा केला अमृतमहोत्सव स्वातंत्रदिन

हे देखील वाचा