Saturday, July 27, 2024

Republic day 2024 | अशी गाणी जी ऐकून तुमच्याही अंगावर येतील शहारे! ‘ए वतन’ ते ‘तेरी मिट्टी’सह ‘या’ गाण्यांसोबत साजरा करा स्वातंत्र्यदिन

भारत देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यामुळेच आज आपण मोकळा श्वास घेऊन शकत आहोत. हे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक थोर नेते, समाजसुधारक आपल्या प्राणाची पर्वा ही न करता स्वातंत्र्यासाठी झटले आहेत. त्यांच्या याच लढ्यामुळे आज आपण स्वतंत्र झालो आहोत. या लढ्यामध्ये अनेकांना आपल्या प्राणांची आहुती देखील द्यावी लागली आहे. आजच्या दिवशीच भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले होते, म्हणूनच आजचा दिवस आपण स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. आज ही देशभक्तीपर गीतं ऐकून सर्वजण स्वातंत्र्यदिन साजरा करत असतात. बॉलिवूडमध्ये देशभक्तीवर अनेक चित्रपट आणि गाणी बनली आहेत. यातील बरीच गाणी अशी आहेत की, जी अनेकजण आपल्या लहानपणापासून ऐकत असतील. तर आजही या गाण्यांची आवड अगदीच तशीच आहे. चला तर मग ही लोकप्रिय देशभक्तीपर हिट गाणी ऐकुया.

ए वतन (राझी)
आलिया भट्टचा चित्रपट ‘राझी’मधील ‘ए वतन’ हे गाणे ऐकून मन खूप भावूक होते. त्याचबरोबर हे गाणं ऐकून आपल्या सर्वांना देशासाठी काहीतरी करावे असे वाटते. हे गाणे गायिका सुनिधी चौहानने गायले आहे. (These are the songs in Bollywood that come to mind when you hear them)

तेरी मिट्टी (केसरी)
अभिनेता अक्षय कुमारने ‘केसरी’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील ‘तेरी मिट्टी’ हे गाणे गायक बी प्राकने गायले आहे. या गाण्यात देशासाठी लढणारे सैनिक, देशासाठी त्यांचे प्रेम आणि कुटुंब सोडून सीमेवर कसे लढतात याबद्दल सांगितले आहे.

ए वतन तेरे लिए (कर्मा)
ए वतन तेरे लिए हे गाणं ‘कर्मा’ या चित्रपटातील आहे. हे गाणे मोहम्मद अझीझ आणि कविता कृष्णमूर्ती यांनी गायले आहे. हे गाणे ऐकून मनात एक वेगळाच उत्साह निर्माण होतो. हे गाणं ऐकताच अक्षरश: अंगावर शहारे येतात.

कर चले हम फिदा (हकिकत)
कर चले हम फिदा या गाण्यात शत्रूंपासून देशाचे संरक्षण करण्यासाठी सैनिक सीमेवर कशा पद्धतीने लढतात हे दाखवण्यात आले आहे.

मेरा रंग दे बसंती चोला (द लेजेंड ऑफ भगत सिंग)

 

‘द लेजेंड ऑफ भगत सिंग’ या चित्रपटात शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचे चित्रीकरण केले आहे. त्याचबरोबर ‘रंग दे बसंती चोला’ या गाण्यात भगतसिंग आणि त्याचे साथीदार देशासाठी प्राणांची आहुती देत असताना फाशी देण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू कसा आनंदाने साजरा करतात हे दाखवण्यात आले आहे.

अधिक वाचा- 
स्वातंत्र्यदिन विशेष!! जेव्हा भारतातील ‘या’ चित्रपटांना घाबरला होता पाकिस्तान, थेट घातली गेली त्यावर बंदी
चाळिशीत अभिनेत्रीचा हॉट अंदाज आला समोर, साडीतील ‘हे’ फोटो वेधतायत लक्ष

हे देखील वाचा