Saturday, August 2, 2025
Home हॉलीवूड काळीज तोडणारी बातमी! 5 दशके इंडस्ट्री गाजवणाऱ्या दिग्गज अभिनेत्रीचे निधन, मिळवलेला ‘सेक्स बॉम्ब’चा किताब

काळीज तोडणारी बातमी! 5 दशके इंडस्ट्री गाजवणाऱ्या दिग्गज अभिनेत्रीचे निधन, मिळवलेला ‘सेक्स बॉम्ब’चा किताब

कलाविश्वातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री रॅक्वेल वेल्श यांचे बुधवारी (दि. 15 फेब्रुवारी) निधन झाले. 1960च्या दशकात आपल्या अदांचा जलवा दाखवून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान मिळवले होते. आता वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. रॅक्वेल यांनी प्रसिद्ध अभिनेत्री आणि आंतरराष्ट्रीय सेक्स सिम्बॉल म्हणून प्रसिद्धी मिळवली होती. त्या दीर्घकाळापासून आजारी होत्या आणि त्यामुळेच त्यांनी या जगाचा निरोप घेतला.

तब्बल 5 दशके सिनेमात दिले योगदान
अभिनेत्री रॅक्वेल वेल्श (Raquel Welch) यांच्या निधनाची पुष्टी त्यांच्या मॅनेजरने केली आहे. मॅनेजर स्टीव्ह साऊएरने अभिनेत्रीच्या निधनाची माहिती देत सांगितले की, “अभिनेत्रीने आजारपणामुळे आज सकाळी जगाचा निरोप घेतला.” पुढे बोलताना मॅनेजरने सांगितले की, “रॅक्वेल यांनी 50 वर्षे सिनेजगतात घालवले होते. त्यांनी त्याच्या कारकीर्दीत 30 सिनेमे आणि 50 टीव्ही शोमध्ये काम केले होते. यासोबतच रॅक्वेलने अनेक प्रोजेक्ट्समध्ये कॅमिओदेखील केला आहे.”

विशेष म्हणजे, रॅक्वेलने गोल्डन ग्लोब पुरस्कारही पटकावला आहे.

सन 1960मध्ये सुरू केली कारकीर्द
रॅक्वेल यांच्या कुटुंबाबाबत बोलायचं झालं, तर त्यांना 2 मुले आहेत. त्यांच्या मुलाचे नाव डेमन वेल्श आहे, तर मुलीचे नाव टहनी वेल्श आहे. रॅक्वेल यांनी त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात 1960मध्ये केली होती. मात्र, त्यांना खरी ओळख 1966मध्ये आलेल्या ‘फँटास्टिक वोयाज’ आणि ‘वन मिलियन इअर्स बी. सी.’ या सिनेमांमधून मिळाली होती. या सिनेमांमध्ये रॅक्वेल यांनी त्यांच्या अशा अभिनय शैलीचे प्रदर्शन केले होते, ज्याने लोक त्यांचे दीवाने झाले होते. या सिनेमांनंतर रॅक्वेल यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. सन 1973मध्ये रिलीज झालेल्या ‘द थ्री मास्कीटियर्स’साठी रॅक्वेल यांना हॉलिवूडच्या सर्वात प्रतिष्ठित गोल्डन ग्लोब पुरस्काराने नावाजले गेले होते.

या सिनेमामुळे मिळाला ‘सेक्स बॉम्ब’चा किताब
‘वन मिलियन इअर्स बी. सी.’मध्ये रॅक्वेल यांनी त्यांचा फिगर फ्लॉन्ट केला होता. त्यामुळे त्यांना ‘सेक्स सिम्बॉल’ आणि ‘सेक्स बॉम्ब’ ही नावे मिळाली होती. त्यामुळे रॅक्वेल यांना अनेकदा बोल्ड पात्रांच्या ऑफर मिळाल्या होत्या. त्यांच्या प्रसिद्ध सिनेमांमध्ये ‘100 रायफल्स’, ‘द प्रिन्स एँड द पॉपर’, ‘चेअरमन ऑफ द बोर्ड’ आणि ‘लीगली ब्लॉन्ड’ यांसारख्या अनेक  सिनेमांचा समावेश होता. (sad news raquel welch death hollywood actress died at the age of 82 read here)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय चित्रपटाचे ‘जनक’ दादासाहेब फाळके यांनी अशाप्रकारे दिले चित्रपटांना जीवनदान, वाचा त्यांचा प्रवास
ऋषी कपूर यांच्यासोबत पदार्पण केलेल्या ‘या’ अभिनेत्रीला, ‘हम पांच’ने दिली खरी ओळख, वाचा तिच्या प्रवासाबद्दल

हे देखील वाचा