Friday, December 1, 2023

दुःखद! प्रसिद्ध हाॅलिवूड अभिनेत्याचे निधन, सिनेसृष्टीत पसरली शाेककळा

ज्येष्ठ हॉलिवूड अभिनेता ब्रेट हॅडली यांनी वयाच्या 92व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. अभिनेत्याच्या मृत्यूची पुष्टी त्याची जवळची मैत्रीण मेरी अॅन हॅलपिन यांनी केली. मेरी यांनी हॅडलीसोबतच्या संस्मरणीय क्षणांची फाेटाे शेअर करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

मेरी अॅन हॅलपिन (mary ann halpin ) यांनी त्यांच्या मित्राच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे आणि हॅलपिन हॅडलीच्या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांची जवळची मैत्रीण डार्सी ली कॅप्लानचे आभार मानले.

अभिनेत्याची तीन दशकांहून अधिक काळ असलेली मैत्रीण डार्सीली यांनी माध्यमांशी बाेलताना सांगितले की, “वुडलँड हिल्समधील मोशन पिक्चर अॅन्ड टेलिव्हिजन कंट्री हाऊस अॅन्ड हॉस्पिटलमध्ये हाडांच्या संसर्गामुळे झालेल्या सेप्सिसमुळे अभिनेत्याचा बुधवारी (14 जुन)ला मृत्यू झाला.”

25 सप्टेंबर 1930 रोजी लुईसविले, केंटकी येथे जन्मलेल्या हेडली यांनी नाटकाचा अभ्यास करण्यासाठी न्यू मेक्सिको विद्यापीठात प्रवेश घेतला, ज्यानंतर त्यांनी शिकागोमधील गुडमन थिएटरमधून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. हेडली यांनी ‘रूम 222’, ‘आयरनसाइड’, ‘पोलिस स्टोरी’, ‘कोजॅक’, ‘द वॉल्टन’, ‘द रॉकफोर्ड फाइल्स’, ‘द कोल्बीज अॅन्ड हायवे टू हेवन’ आणि ‘द मॅड बॉम्बर’ (1973), ‘फनी लेडी’ (1975), ‘नेक्स्ट ऑफ किन’ (1975) यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका केल्या आहेत. ब्रेट हॅडलीने 1980 ते 1990 पर्यंत ‘द यंग अँड द रेस्टलेस’मध्ये कार्ल विल्यम्सच्या भूमिकेत प्रेक्षकांचे मन जिंकले.(Sad! The death of a famous Bollywood actor spread mourning in the film industry)

अधिक वाचा-
‘मैं निकला गड्डी लेके’वर सनी देओलने लावले ठुमके, व्हिडिओ नाही पाहिला तर मग काय पाहिलं?

बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलला होणार अटक?, रांची कोर्टाने वॉरंट केले जारी

हे देखील वाचा