Sunday, April 14, 2024

बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलला होणार अटक?, रांची कोर्टाने वॉरंट केले जारी

अमिषा पटेल ही अशी अभिनेत्री आहे जिने हिंदी तसंच तमिळ, तेलगू चित्रपटांमध्ये काम केले आहे. बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा 2001मध्ये आलेला ‘गदर: एक प्रेम कथा’ हा चित्रपट प्रचंड गाजला होता. तब्बल 22 वर्षांनंतर या प्रेमकथेची कथा पुन्हा एकदा पुढे नेण्यात येणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेल दिसणार आहे. त्यामुळे ती चर्चेत आली आहे. ती सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. पण सध्या अमीषा पटेल एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.

‘गदर’च्या सिक्वेलमध्ये अमीषा पटेल सकिनाच्या भूमिकेत दिसणार आहे. ती या चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. दरम्यान, एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. अमिषा पटेलला न्यायालयाने चेक बाऊन्स प्रकरणाी वॉरंट जारी केले होते. त्यानंतर आज अमीषा पटेल कोर्टात हजर झाली होती. ‘गदर 2’ रिलीज होण्यापूर्वीच अमीषाला आलेल्या वॉरंटमुळे बॉलिवूड सेलिब्रिटी आणि चाहत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

अमिषाची (Amisha Patel) 2017 सालची एक केस रांची कोर्टात सुरू आहे. चेक बाऊन्स प्रकरणात अमिषा पटेल हिला रांचीच्या दिवाणी न्यायालयात हजर राहण्याची सूचना देण्याच आली होती. अमिषा रांची दिवाणी न्यायाधीश शुक्ला यांच्या न्यायालयात हजर राहिली होती. सध्या तिला कोर्टाकडून 10 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीनही मिळाला आहे. तिला तीन दिवसांसाठी हा जामीन मिळाला आहे. या प्रकरणी तिला 21 जून रोजी पुन्हा न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. ती कोर्टात हजर न राहिल्यास जामीनपत्र फेटाळण्यात येणार आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, अजय कुमार सिंग यांनी 2018मध्ये अभिनेत्री अमिषा पटेलवर गुन्हा दाखल केला होता. अमिषा पटेल आणि तिचा भागीदार क्रुणालने चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर व्याजासह पैसे देणार असे म्हटले होते. पण हा चित्रपट झाला नाही. त्या चित्रपटाच नाव ‘देसी मॅजिक’ आहे. या चित्रपटाचे शूटिंग 2013 मध्ये सुरू करण्यात आल होत. मात्र, हा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. तेव्हा तिने ऑक्टोबर 2018मध्ये त्याला 2.5 कोटी आणि 50 लाख रुपयांचे दोन चेक दिले होते. पण ते बाऊन्स झाले होते. (Court issued arrest warrant to actress Amisha Patel)

अधिक वाचा-
पुतण्याच्या संगीत सोहळ्यात बॉबी देओलने पत्नीसोबत केला रोमँटिक डान्स, पाहा व्हिडिओ
अभिनेत्री आलिया भट्टचा ग्लॅमरस अंदाज; फोटो व्हायरल

 

हे देखील वाचा