×

पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये अभिनेत्री सई लोकूर दिसतीये अगदी रूपवती, चाहत्यांना भावला सोज्वळ अंदाज

‘बिग बॉस मराठी’ फेम आणि बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे सई लोकूर होय. सई लोकुर ही चित्रपटासोबत सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असतात. ती तिच्या पतीसोबत देखील अनेकवेळा फोटो शेअर करत असते. अशातच सईने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

सई लोकूरने अलीकडेच तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये आपण पाहू शकतो की, तिने पिवळ्या रंगाची सुंदर अशी साडी नेसली आहे. तिच्या साडीला निळ्या रंगाचा काठ आहे. तिने साडीला मॅचिंग अशी ज्वेलरी घातली आहे. तसेच केसांची वेणी घालून कपाळी छोटीशी टिकली लावली आहे. या लूकमध्ये ती खूपच सोज्वळ आणि सुंदर दिसत आहे. तिच्या चाहत्यांना हा लूक खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर कमेंट करून तिच्या या लूकचे कौतुक करत आहेत. (Sai lokur share her beautiful saree photos on social media)

View this post on Instagram

A post shared by Sai Lokur Roy (@sai.lokur)

सईने डिसेंबर २०२० मध्ये तीर्थदीप रॉय याच्याशी लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो देखील तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. आजकाल सई सोशल मीडियावर नेहमीच तिचे फोटो व्हिडिओ शेअर करत असते. त्यामुळे तिचे चाहते देखील खूप खुश आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sai Lokur Roy (@sai.lokur)

सई ही बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमध्ये स्पर्धक होती. या शोमध्ये ती फिनालेपर्यंत गेली होती. पण ती हा शो जिंकू शकली नव्हती. त्यानंतर ती खूप चर्चेत आली. या शोने तिला खरी ओळख मिळाली. बिग बॉसच्या घरात असताना तिची आणि पुष्कर जोगची मैत्री खूप चर्चेत आली होती.

सई लोकूरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास तिने अनेक मराठी तसेच हिंदी चित्रपटात काम केले आहे. तिने ‘किस किस को प्यार करू’, ‘पारंबी’, ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘जरब’, ‘कुछ तुम कहो कुछ हम कहे’, ‘मी आणि तू’, ‘स्माईल प्लिज’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे.

हेही वाचा :

Latest Post