अभिनेत्री उर्वशी रौतेला नेहमीच तिचा स्टाईल आणि लूक्सने सगळ्यांना घायाळ करत असते. तिच्या चाहत्यांना इम्पेस करण्याची एकही संधी ती गमावत नाही. अशातच तिचे काही नवीन फोटो समोर आले आहेत. या फोटोमध्ये तिने टायगर प्रिंटची हाई स्लिट ड्रेस पोझ दिल्या आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. तिचे चाहते तिच्या या लूकचे खूप कौतुक करत आहेत.
हाई स्लीट टायगर प्रिंट ट्रान्स्फरट ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. ती जिन्यावर उभी राहून पोझ देत आहे. या ड्रेसमध्ये ती फारच ग्लॅमरस दिसत आहे. लांब सोनेरी केसांमध्ये आणि परफेक्ट मेकअपमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तिच्या चाहत्यांना तिचा हा लूक खूपच आवडला आहे. हे फोटो शेअर करून तिने जे काही लिहिले आहे ते पाहून असे वाटत आहे की, ती कोणाला तरी विरोधी उत्तर देत आहे. (Urvashi rautela’s photo shoot viral on social media)
उर्वशीने लिहिले आहे की, ‘एन एंजल ऑन अर्थ, कम अंडर माई विंग.” तिचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चचा विषय बनत आहे.
तिचे चाहते सोशल मीडियावर तिचे कौतुक करत आहेत. चाहत्यांना तिची प्रत्येक स्टाईल खूप आवडते.परंतु या ड्रेसमधील लूक काही खास पसंत केला जात आहे. तिचे चाहते तिच्या या फोटोवर कमेंट करत आहेत. एका चाहत्याने या फोटोवर “वाघीण” अशी कमेंट केली आहे. ती लवकरच इन्स्पेक्टर अविनाश या वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. यात तिच्यासोबत रणदीप हुड्डा दिसणार आहे. त्यांची ही वेबसीरिज पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
हेही वाचा :
- रस्त्यावरील कुत्र्याचा जीव वाचवणाऱ्याला लोकांनी म्हटले वेडे, तर अनुष्का शर्मा म्हणाली, “वेडे तर ते लोकं आहेत जे…’
- पारदर्शी ड्रेसमध्ये बोल्ड फोटोशूट करत कियाराने लावली सोशल मीडियावर आग
- माधुरी दिक्षीतला नाही स्टारडम गमावण्याची भीती, धकधक गर्लने केला खुलासा